नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२ वीचा निकाल प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये दिल्लीतील हंसिका शुक्ला आणि उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील करिष्मा अरोरा यांनी देशभरातून प्रथम क्रमांक पटकावला. दोघींनी ५०० पैकी ४९९ गुण संपादित केले. देशभारात त्यांचे कौतुक केले जात आहे.
यंदाच्या निकालात उत्तीर्ण होण्याऱ्यांमध्ये ०.३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच यावेळी ८३.४० टक्के विद्यार्थी देशभरातून उत्तीर्ण झाले. देशामध्ये त्रिवेंद्रम येथे ९८.२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, चेन्नई, दिल्ली येथील प्रत्येकी ९२.९३ टक्के आणि ९१.८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तुम्ही आपला निकाल http://cbseresults.nic.in या संकेतस्थळावर जाऊन प्राप्त करू शकता.