ETV Bharat / bharat

इशरत जहां प्रकरण: माजी पोलीस अधिकारी डी. जी. वंजारा आणि एन. के. अमिन निर्दोष - जे. के. पांड्या

गुजरात सरकारने खटला चालवण्याची परनवानगी न दिल्यामुळे दोघांची विनंती मान्य करण्यात येत आहे, असे सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधिश जे. के. पांड्या यांनी निर्वाळा देताना म्हटले.

Ishrat Jahan
author img

By

Published : May 2, 2019, 3:27 PM IST

गांधीनगर - इशरत जहां बनावट चकमक प्रकरणातील आरोपी माजी पोलीस अधिकारी डी. जी. वंजारा आणि एन. के. अमिन यांची विशेष सीबीआय न्यायालाने निर्दोष मुक्तता केली आहे. गुजरात सरकारकडून दोन्ही अधिकाऱयांविरोधात खटला चालवण्याची परवानगी न मिळाल्यानंतर दोघांनी दोषमुक्त करण्याचे निवेदन दिले होते.

गुजरात सरकारने खटला चालवण्याची परनवानगी न दिल्यामुळे दोघांची विनंती मान्य करण्यात येत आहे, असे सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधिश जे. के. पांड्या यांनी निर्वाळा देताना म्हटले. भारतीय दंड विधानाची कलम १९७ अतंर्गत कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने कर्तव्याबाबत खटला चालवण्यासाठी सरकारची मंजूरी मिळणे आवश्यक असते, असे त्यांनी म्हटले.

मुंबई येथील रहिवासी इशरत, जावेद शेख, अमजद आली अकबर आणि जीशान जोहर यांच्यासोबत १५ जून २००४ ला अहमदाबाद येथे पोलिसांसोबत चकमक झाली होती. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दावा केला आहे की ते दहशतवादी होते. तसेच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासाठी ते गुजरातला आले होते.

डी. जी. वंजारा हे गुजरातचे उपपोलीस महानिरिक्षक होते. त्यांनी २००७ ते २०१५ पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा भोगली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.