ETV Bharat / bharat

एस. व्ही. रंगनाथ यांची 'कॅफे कॉफी डे'च्या हंगामी अध्यक्षपदी नेमणूक

सिद्धार्थ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना संचालक मंडळाने कंपनीच्या व्यवस्थापन टीमला आपला पाठिंबा दर्शवताना त्यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.

एस. व्ही. रंगनाथ
author img

By

Published : Jul 31, 2019, 6:04 PM IST

मुंबई - 'कॅफे कॉफी डे' कंपनीच्या संचालक मंडळाने एस. व्ही. रंगनाथ यांची हंगामी अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. मंगळुरु पोलिसांना कंपनीचे संस्थापक अध्यक्ष व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह नेत्रावती नदीत सापडला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ते सुमारे ३६ तासांपासून बेपत्ता होते. सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई होते.

संचालक मंडळाच्या बैठकीत एस. व्ही. रंगनाथ यांच्या हंगामी नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. ही बैठक सकाळपासून दुपारी १ वाजेपर्यंत चालली. नितीन बागमाने यांचीही मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर हंगामी नियुक्ती करण्यात आली आहे.

सीसीडीचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ सोमवारी बेपत्ता झाले होते. मच्छिमारांना नेत्रावती नदीत त्यांचा मृतदेह सापडला. सिद्धार्थ यांना नदीच्या पुलावर शेवटचे जेथे पाहण्यात आले होते, त्यापासून काही अंतरावरच त्यांचा मृतदेह आढळून आला. सीसीडी कंपनीने सिद्धार्थ यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातील मजकुराची दखल घेतली आहे. त्यांनी कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापन, ऑडिटर्स आणि संचालक मंडळाच्या परस्पर केलेल्या आर्थिक व्यवहारांविषयी यामध्ये लिहिले आहे.

'दरम्यान, सिद्धार्थ यांच्या पत्राची विश्वासार्हता अद्याप पडताळलेली नाही. तसेच, ही माहिती कंपनीशी संबंधित व्यवहारांविषयी आहे की वैयक्तिक व्यवहारांविषयी आहे, याबद्दल अनिश्चितता आहे. मात्र, कंपनीने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. तसेच, याचा सखोल तपास करण्यात येणार आहे,' असे सांगण्यात आले आहे.

Intro:Body:

एस. व्ही. रंगनाथ यांची 'कॅफे कॉफी डे'च्या हंगामी अध्यक्षपदी नेमणूक

मुंबई - 'कॅफे कॉफी डे' कंपनीच्या संचालक मंडळाने एस. व्ही. रंगनाथ यांची हंगामी अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. मंगळुरु पोलिसांना कंपनीचे संस्थापक अध्यक्ष व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह नेत्रावती नदीत सापडला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ते सुमारे ३६ तासांपासून बेपत्ता होते. सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई होते.

संचालक मंडळाच्या बैठकीत एस. व्ही. रंगनाथ यांच्या हंगामी नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. ही बैठक सकाळी साडेपासून दुपारी १ वाजेपर्यंत चालली. नितीन बागमाने यांचीही मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर हंगामी नियुक्ती करण्यात आली आहे.

सीसीडीचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ सोमवारी बेपत्ता झाले होते. मच्छिमारांना नेत्रावती नदीत त्यांचा मृतदेह सापडला. सिद्धार्थ यांना नदीच्या पुलावर शेवटचे जेथे पाहण्यात आले होते, त्यापासून काही अंतरावरच त्यांचा मृतदेह आढळून आला. सीसीडी कंपनीने सिद्धार्थ यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातील मजकूराची दखल घेतली आहे. त्यांनी कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापन, ऑडिटर्स आणि संचालक मंडळाच्या परस्पर केलेल्या आर्थिक व्यवहारांविषयी यामध्ये लिहिले आहे.

'दरम्यान, सिद्धार्थ यांच्या पत्राची विश्वासार्हता अद्याप पडताळलेली नाही. तसेच, ही माहिती कंपनीशी संबंधित व्यवहारांविषयी आहे की वैयक्तिक व्यवहारांविषयी आहे, याबद्दल अनिश्चितता आहे. मात्र, कंपनीने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. तसेच, याचा सखोल तपास करण्यात येणार आहे,' असे सांगण्यात आले आहे.

सिद्धार्थ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना संचालक मंडळाने कंपनीच्या व्यवस्थापन टीमला आपला पाठिंबा दर्शवताना त्यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.