कुशीनगर (उत्तर प्रदेश) - मजूरांना घेऊन जाणाऱ्या बसने, कांद्याने भरलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात बसमधील १२ मजूर जखमी झाले आहेत. यातील ७ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २८ वरील शाही पेट्रोल पंपाजवळ झाला.
कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकारणाने मजूर आपापल्या गावी मिळेल त्या मार्गाने पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मजूरांना घेऊन एक बस नोएडावरून बिहारच्या भागरपूर येथे निघाली होती. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २८ वरील शाही पेट्रोल पंपाजवळ त्या बसचा अपघात झाला. बसने कांद्याच्या ट्रकला जोरदार धडक दिली.
या अपघातात १२ मजूर जखमी झाले. तर बसचा समोरील भाग पूर्णपणे डॅमेज झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं. जखमींपैकी ७ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितल आहे.
हेही वाचा - उत्तर प्रदेश-मध्य प्रदेश सीमेवर झांसी येथे स्थलांतरीत कामगारांनी घातला गोंधळ
हेही वाचा - अयोध्यामध्ये पीकअप-ट्रकची समोरासमोर धडक, 20 स्थलांतरीत कामगार जखमी