ETV Bharat / bharat

ग्राहकाला व्हेज ऐवजी दिला नॉनव्हेज बर्गर; 'बर्गर किंग'ला ६० हजारांचा दंड

२०१८ साली मनीष कुमार जालंधर येथील बर्गर किंग या दुकानात बर्गर खायला गेले होते. तेथे त्यांनी दोन व्हेज बर्गर ऑर्डर केले होते. मात्र, दुकानातील कर्मचाऱ्याने त्यांना नॉनव्हेज बर्गर खायला दिले.

author img

By

Published : Jan 19, 2020, 1:50 PM IST

burger king news panjab
बर्गर किंग बातमी

चंदिगड - पंजाबमधील 'बर्गर किंग' या फास्ट फुडच्या दुकानाला ग्राहकाने चांगलाच हिसका दाखवला आहे. झाले असे की, मनीष कुमार नावाच्या एक ग्राहकाने बर्गर किंगमधून दोन व्हेज बर्गर ऑर्डर केले होते. मात्र, डिलीवरी बॉयने त्यांना नॉनव्हेज बर्गर आणून दिले होते. यावरून मनीष कुमार यांनी ग्राहक संरक्षण मंचामध्ये धाव घेतली होती.

ग्राहकाला व्हेज ऐवजी दिला नॉनव्हेज बर्गर; 'बर्गर किंग'ला ६० हजारांचा दंड

२०१८ साली मनीष कुमार जालंधर येथील बर्गर किंग या दुकानातून बर्गर ऑर्डर केले होते. मात्र, त्यांना व्हेज बर्गर ऐवजी नॉनव्हेज बर्गर देण्यात आला. नॉनव्हेज बर्गर खाल्ल्यानंतर कुमार यांची प्रकृती बिघडली होती, तसेच त्यांना उलट्याही झाल्या होत्या, असे त्यांचे म्हणणे आहे.

या घटनेनंतर त्यांनी बर्गर किंगला कर्मचाऱ्याने केलेल्या चुकीचा जाब विचारला. बर्गर शॉपने आपली चूक मान्यही केली होती. त्यानंतर मनीष कुमार यांनी ग्राहक संरक्षण मंचात बर्गर किंग विरोधात तक्रार दाखल केली. नॉनव्हेज बर्गर खाल्यामुळे माझी प्रकृती बिघडली तसेच धार्मिक भावना दुखावल्याने मला न्याय मिळावा, अशी मागणी तक्रारीत केली होती.

याप्रकणी १६ जानेवारी २०२० ला निकाल लागला. ग्राहक संरक्षण न्यायालयाने बर्गर किंग शॉपला 60 हजार रुपये नुकसान भरापाई पोटी देण्याचे आदेश दिले. यातील १० हजार रुपये वकिलाची फी म्हणून देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले आहेत.

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.