कांकेर (छत्तीसगड) - नक्षली क्षेत्रात तैनात असलेल्या बीएसएफच्या 157 बटालियनमधील एका जवानाने स्वतावर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी पहाटे चार वाजता घडली.
जवान सुरेश कुमार (मुळ रा. हरियाणा) हे आपल्या पथकासह शोधमोहिमेवरून कॅम्पला परतत होते. कॅम्प फक्त 100 मीटर अंतरावर असताना त्यांनी रायफलमधून स्वतःवर गोळी चालवली. अचानक झालेल्या या घटनेने पथकातील जवानांमध्ये खळबळ उडाली. जवान सुरेश कुमार यांना तात्काळ कॅम्पमध्ये नेण्यात आले. पण, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच बीएसएफ आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. जवानाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह त्यांच्या मूळगावी पाठविण्यात येणार आहे.
हेही वाचा - छत्तीसगड : माओवाद्यांनी पेरलेले दोन आयईडी बॉम्ब हस्तगत, पोलीस दलाचे यश