लखनऊ - उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरपूरमध्ये एका भाजप नेत्याच्या भावाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या परवाना असलेल्या पिस्तुलातून त्याने स्वतःवर गोळी झाडून घेलती. अजय कुमार अगरवाल असे या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजयकुमार ट्रान्सपोर्ट फायनान्सर म्हणून काम पाहत होते. काही दिवसांपासून ते तणावाखाली होते. यातूनच बुधवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
उत्तर प्रदेशमधील भाजप नेते संजय अगरवाल यांचे ते मोठे बंधू होते. घटनेची माहिती मिळताच राज्यातील अनेक भाजप नेत्यांनी संजय यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.