जयपूर - देशात पसरलेल्या कोरोना महामारीला पराभूत करण्यासाठी, सामाजिक अंतर आणि लॉकडाउन अत्यंत महत्वाचे आहे. या साथीने लोकांमध्येच नव्हे तर अनेक नात्यांमधीलही अंतर वाढवले आहे. भरतपूर जिल्ह्यातील सरसेना गावात भावाला आपल्या बहिणीचा विवाह झाल्यानंतर ती रडत असाताना तिला 'सोशल डिस्टन्सिंग'मुळे गळाभेट घेता आली नाही. यामुळे भावाने हात जोडून बहिणीची सासरी पाठवणी केली.
भरतपूर जिल्ह्यातील वैर तहसील येथील सरसेना गावचा रहिवासी वधू हरवीर सिंग धरसोनी गावात राहणाऱया अनसुईया या मुलीशी लग्न करण्यासाठी आला होता. या लग्नात सरकारच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन दोन्ही बाजूचे एकूण 5 लोक लग्नाला आले होते. त्यापैकी मुलाकडून 3 लोक आले होते. तर मुलीकडून मुलगी आणि तिचा भाऊ, असे पाचच लोक या लग्नाला उपस्थित होते. लग्न संपूर्ण विधी आणि रीतीने पार पडले. पण, जेव्हा अनसुईयाचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले.