ETV Bharat / bharat

हनिमूनऐवजी जावं लागलं क्वारंटाईन सेंटरमध्ये, कोरियातल्या नवविवाहित जोडप्यासोबत काय घडलं? - मध्यप्रदेश बातमी

लग्न मध्यप्रदेशातील नौराजाबाद येथे पार पडले. सुशील आपल्या मोजक्या कुटुंबीयांसह मध्यप्रदेशात गेला होता. जाताना पोलिसांनी अडविले नाही.

quarantine
नवविवाहीत जोडपं १४ दिवस क्वारंटाईन
author img

By

Published : May 8, 2020, 4:24 PM IST

रायपूर - लग्न समारंभ पार पडल्यानंतर नवविवाहित जोडपे हनीमूनला जातात. मात्र, हे सर्व कोरोनाच्या आधी शक्य होते. छत्तीसडमधील एका जोडप्याला लग्न झाल्यानंतर हनीमून ऐवजी क्वारंटाईन सेंटरमध्ये जावे लागले. हनीमून तर दुरच त्यांना घरीसुद्धा जाता आले नाही. त्याला कारण म्हणजे कोरोनामुळे देशभर पाळण्यात येत असलेलं सोशल डिस्टन्सिंग. इतरांच्या सुरक्षिततेसाठी नवविवाहित जोडप्याची रवानगी क्वारंटाईन सेंटरमध्ये केली आहे. ही घटना राज्यातील कोरिया जिल्ह्यात घडली.

नवविवाहीत जोडपं १४ दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये

लग्नाची सुंदर स्वप्ने रंगवणाऱ्या वधू आणि वराने लग्नानंतर आपल्यावर अशी वेळ येईल याचा कधी विचारही केला नसेल, मात्र, आता त्यांना १४ दिवसांचा वनवास सहन करावा लागणार आहे. मध्यप्रदेशातली नौरोजाबाद येथून लग्न करून माघारी छत्तीगडमध्ये जात असताना त्यांना पोलिसांनी अडविले. कोरिया जिल्ह्यातील मनेंद्रगड या गावी पोलिसांनी त्यांना जाऊ दिले नाही. क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले. त्यांच्याबरोबर मुलाच्या आईलाही क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सुशील गुप्ता असे नवरदेवाचे नाव असून ६ मेला सुमन या तरुणीशी त्याचा विवाह झाला. लग्न मध्यप्रदेशातील नौराजाबाद येथे पार पडले. सुशील आपल्या मोजक्या कुटुंबीयांसह मध्यप्रदेशात गेला होता. जाताना पोलिसांनी अडविले नाही. मात्र, माघारी येताना पोलिसांनी क्वांरटाईन होण्याचे आदेश दिले.

नवरदेवाचे वडील अडकले उत्तरप्रदेशात

विवाहाच्या आधी आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेवून वडील उत्तरप्रदेशात गेले होते. मात्र, अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते उत्तरप्रदेशातच अडकून पडले आहेत. मुलाच्या अंगावर अक्षदा पडल्या तरी वडिलांना माघारी येता आले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.