हैदराबाद- राज्यातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या माणल्या जाणाऱ्या बोनालू म्हणजेच आषाढ जत्रेच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. सिकंदराबाद येथील महाकाली मंदिरात या उत्सवाची सुरुवात झाली असून वर्षातून एकदा जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान हा सण साजरा केला जातो.
याप्रसंगी राज्यमंत्री तलासनी श्नीवास स्वामी यांनी भल्या सकाळी मंदिरातील देवीला साडी अर्पण केली. त्यानंतर आषाढ जत्रेला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी जवळपास ४ लाख भक्तगण या मंदिराला दर्शन देतील असा अंदाज आहे.
राज्यमंत्री तलासनी श्रीनिवास बरोबरच केंद्रीय गृहसचिव (राज्य) जी. किशन रेड्डी, व राज्यमंत्री श्रिनिवास गौड यांच्यासह इतर मंत्र्यांनीही महाकाली मंदिराला भेट दिली. मंदिर परिसराच्या सुरक्षेसाठी २००० पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहेत. यावेळी पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला.
जाणून घ्या 'बोनालू' आषाढ जत्रेच्या उत्सवामागची कथा....
दरवर्षातून एकदा आषाढ महिन्यात देवी आपल्या माहेरी येत असल्याची इथल्या लोकांचा समज आहे. जसे मुलगी घरी आल्यावर तिच्या परिवाराला आनंद होतो व ते तिचे उत्साहाने स्वागत करतात. त्याच प्रकारे देवी आपल्या घरी परत आल्याचा प्रसंग तेलंगणातील लोक मोठ्या उत्सहाने साजरा करतात. यावेळी लोकांकडून देवीला साडी आणि विशेष नैवद्य अर्पण केला जाते.
या दिवशी लोक सकाळी लवकर उठून स्नानानंतर नवी वस्त्रे परिधान करून पुजेला सुरुवात करतात. यासाठी मातीच्या भांड्यात भात, दही, गुळ, व पाण्याचे मिश्रण शिजवतात. त्यानंतर भांड्याला कुंकु व हळद लावून त्याला देवीला अर्पण केले जाते.