नवी दिल्ली - उत्तर पश्चिम दिल्लीमध्ये गोळीबार झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बब्बर खालसा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना आज दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने माहिती दिली.
बब्बर खालसा ही प्रतिबंधित दहशतवादी संघटना आहे. बब्बर खालसा हा एक दहशतवादी गट म्हणून ओळखला जातो. तर त्याचे समर्थक त्यास प्रतिकार चळवळी मानतात. पंजाबच्या बंडखोरीमध्ये याची प्रमुख भूमिका होती.
बब्बर खालसा इंटरनॅशनलची स्थापना 1978 मध्ये झाली होती. 1990 च्या दशकात पोलिसांशी झालेल्या चकमकींमध्ये संघटनेतील अनेक ज्येष्ठ सदस्य ठार झाल्यानंतर त्याचा प्रभाव कमी झाला. बब्बर खालसा ही कॅनडा, जर्मनी, भारत आणि ब्रिटनसह अनेक देशांमध्ये दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाते.