ETV Bharat / bharat

दिल्ली विधानसभा निवडणूक : भाजपच्या ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर.. - दिल्ली विधानसभा भाजप यादी

या यादीमध्ये माजी आप आमदार कपिल मिश्रा यांचाही समावेश आहे. मात्र, दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात कोण उभे राहणार आहे याचा उल्लेख या यादीमध्ये केला गेलेला नाही. केजरीवाल यांच्या नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असणार, याबाबत लवकरच निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती तिवारी यांनी दिली.

BJP releases first list of 57 candidates for Delhi Assembly polls
दिल्ली विधानसभा निवडणूक : भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर..
author img

By

Published : Jan 17, 2020, 7:16 PM IST

नवी दिल्ली - आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये दिल्लीमधील एकूण ७० जागांपैकी ५७ जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपच्या दिल्ली विभागाचे प्रमुख मनोज तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ५७ उमेदवारांपैकी ११ हे एससी प्रवर्गातील आहेत, तर चार महिला आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणूक : भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर..

या यादीमध्ये आपचे माजी आमदार कपिल मिश्रा यांचाही समावेश आहे. मात्र, दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात कोण उभे राहणार आहे याचा उल्लेख या यादीमध्ये केला गेलेला नाही. केजरीवाल यांच्या नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असणार, याबाबत लवकरच निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती तिवारी यांनी दिली. रोहिणी मतदारसंघाचे आमदार गुप्ता हे पुन्हा तिथूनच निवडणूक लढवणार आहेत. तर, मिश्रा हे मॉडेल टाऊन मतदारसंघातून निवडणूक लढवतील.

BJP releases first list of 57 candidates for Delhi Assembly polls
दिल्ली विधानसभा निवडणूक : भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर..
BJP releases first list of 57 candidates for Delhi Assembly polls
दिल्ली विधानसभा निवडणूक : भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर..

ही यादी जाहीर करताना तिवारी यांच्यासोबत भाजप नेते प्रकाश जावडेकरदेखील उपस्थित होते. गुरूवारी रात्री झालेल्या बैठकीमध्ये जी नावे निश्चित करण्यात आली होती, ती यावेळी जाहीर करण्यात आल्याचे त्यानी सांगितले.

तर, दिल्लीमध्ये सत्तेत असणाऱ्या आम आदमी पक्षाने याआधीच आपल्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दिल्लीमध्ये आठ फेब्रुवारीला मतदान पार पडेल, तर ११ फेब्रुावरीला निकाल जाहीर होणार आहे.

हेही वाचा : निर्भया प्रकरण : आरोपींना एक फेब्रुवारीला होणार फाशी

ZCZC
URG GEN NAT
.NEWDELHI DEL49
NEWSALERT-DL-BJP-CANDIDATES
BJP releases first list of 57 candidates for Delhi Assembly polls. PTI VIT PR
ABH
ABH
01171637
NNNN
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.