ETV Bharat / bharat

सरदार पटेलांचा पुतळा म्हणजे जगातील सर्वात मोठी इमारत - भाजप अध्यक्षांचे विधान - गुजरात

नर्मदा जिल्ह्यातील साधू बेटावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. याठिकाणी कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना नड्डांची बोलताना चूक झाली.

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा
author img

By

Published : Jul 20, 2019, 4:15 PM IST

Updated : Jul 20, 2019, 6:34 PM IST

नवी दिल्ली - भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा यांची कार्यक्रमात जीभ घसरली आहे. एका कार्यक्रमात बोलताना नड्डा म्हणाले, नरेंद्र मोदींची कल्पना बघा, त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची जगातील सर्वात उंच इमारत बांधली आहे.

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांचे विधान

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. नर्मदा जिल्ह्यातील साधू बेटावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. याठिकाणी कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना नड्डा म्हणाले, आदरणीय मोदींची कल्पना बघा. त्यांनी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जगातील सर्वात उंच इमारत बांधली आहे. नड्डांना ही चूक लक्षात येताच त्यांनी सॉरी म्हणत जगातील सर्वात उंच पुतळा म्हणत भाषण सुरू ठेवले. सगळ्यात उंच पुतळा ही मोदींची कल्पना आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी याचा विचार केला होता. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी हा विचार प्रत्यक्षात करुन दाखवला.

गुजरातमध्ये नर्मदा नदीवर भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. मूर्तीची उंची १८२ मीटर (५९७ फूट) असून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (१२८ मीटर) पेक्षा ५४ मीटर जास्त आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 20, 2019, 6:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.