ETV Bharat / bharat

ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालला 'दहशतवादी राज्या'त बदलल्याचा भाजप नेत्याचा आरोप - भाजप

भाजपचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा यांनी पश्चिम बंगाल येथील विविध भागात झालेले आंदोलन आणि जाळपोळीबद्दल येथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जबाबदार ठरवले आहे. ममतांमुळे या राज्याचे दहशतवादी राज्यात रुपांतर झाल्याचे सिन्हा म्हणाले. बर्धमान येथील टाऊन हॉल येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

राहुल सिन्हा
राहुल सिन्हा
author img

By

Published : Jan 10, 2020, 1:27 PM IST

बर्धमान - भाजपचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा यांनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्याला दहशतवादाचे मुख्य केंद्र बनवल्याचा आरोप केला. ते बर्धमान टाऊन हॉल मैदानावर आयोजित एका सभेदरम्यान पत्रकारांशी बोलत होते.

सिन्हा म्हणाले, ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगाल राज्याचे दहशतवादी राज्यात रुपांतर झाले आहे. यामुळेच २०१९ मध्ये झालेल्या सर्वसाधारण निवडणुकीत भाजपने १८ जागांवर विजय मिळवला होता. हा विजय म्हणजे ममतांच्या तोंडावर एक प्रकारची चपराक होती. तर, २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येथील जनता आम्हाला निवडून देतील.

या राज्यात सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात निदर्शनांदरम्यान कितीतरी पक्षाचे कार्यकर्ते तुरुंगात तर, कुणी रुग्णालयात आहेत, याची कुणाला काळजी आहे का? पोलिसांसमोर कार्यक्रम होण्यापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांवरही हल्ला करण्यात आला होता, असे सिन्हा म्हणाले.

बॅनर्जी शिक्षण, रोजगार सारख्या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यास अयशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळेच आता त्या सीएए आणि एनआरसी कायद्याचा विरोध करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीकाही सिन्हा यांनी केली.

हेही वाचा - निर्भया प्रकरण: 'जर मला फाशी झाली तर माझं कुटुंब उद्ध्वस्त होईल'

देशभरात मोठ्या प्रमाणात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) कायद्याबाबत होणाऱ्या विरोधाबाबत पश्चिम बंगालसह देशभरात विरोध प्रदर्शन होत आहेत. याबाबतचा विरोध आणि विरोधकांना सामोरे जाणाऱ्या नागरिकत्व कायद्याच्या तरतुदींविषयी लोकांना माहिती देण्यासाठी भाजपच्या मोहिमेचा एक भाग म्हणून सिन्हा बर्धवान टाऊन हॉल मैदानावरील जाहीर सभेत सहभागी झाले होते.

हेही वाचा - इंटरनेट सुविधा हा मूलभूत अधिकार; जम्मू-काश्मीर मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले

Intro:Body:

https://www.aninews.in/news/national/politics/bjp-leader-accuses-mamata-banerjee-of-turning-west-bengal-into-terrorist-state20200110043749/

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.