ETV Bharat / bharat

राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्याचा भाजपकडून प्रयत्न - मुख्यमंत्री गेहलोत - काँग्रेस सरकार राजस्थान बातमी

काँग्रेस सरकार अस्थिर करण्याच्या प्रकारावरून पोलिसांच्या विशेष पथकाने दोन व्यक्तींविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. काँग्रेसच्या आमदारांना पैसे देऊन फोडण्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत
मुख्यमंत्री अशोक गेहलोत
author img

By

Published : Jul 11, 2020, 5:45 PM IST

जयपूर - काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा आणि पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज(शनिवार) केला. भाजपा निर्लज्जांचा पक्ष असून आमदारांना पक्ष बदलण्यासाठी कोट्यवधी रुपयाचे लालच देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला.

आपण सर्वांनी कोरोना विषाणूचा सामना करण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, आम्ही तेच करत आहोत. मात्र, भाजप आमचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. वाजपेयीजींच्या काळात असे नव्हते. मात्र, 2014 नंतर धर्माच्या आधारावर फूट पाडण्यात येत आहे. भाजप सत्तेत आल्यापासून मग्रूरपणे वागत असून त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. भाजपकडून फॅसिझमला प्रोत्साहन दिलं जात आहे, असा आरोप मुख्यमंत्री गेहलोत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

काँग्रेसच्या 24 आमदारांनी संयुक्तपणे एक निवेदन जारी केल्यानंतर गेहलोत यांनी भाजपवर हल्ला केला. भाजपा काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी आमदारांना प्रलोभने दाखविण्यात येत आहे. तसेच यात वरिष्ठ भाजपा नेते सहभागी असल्याचा दावा काँग्रेसच्या 24 आमदारांनी केला आहे.

काँग्रेस सरकार अस्थिर करण्याच्या प्रकारावरून पोलिसांच्या विशेष पथकाने दोन व्यक्तींविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. काँग्रेसच्या आमदारांना पैसे देऊन फोडण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस मुख्यमंत्री गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचेही वक्तव्य रेकॉर्ड करुन घेणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.