ETV Bharat / bharat

बिहार निवडणूक : लोजपा, जदयुमधील अर्तंगत वाद ठरतोय भाजपासाठी डोकेदुखी - internal crisis in jdu and ljp in bihar

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने लोक जनशक्ती पार्टी आणि जदयुसोबत युती केली आहे. मात्र आता लोजपा आणि जदयुमधील अर्तंगत वाद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची डोकेदुखी ठरत आहे.

BIHAR ASSEMBLY ELECTION
बिहार विधानसभा निवडणुक
author img

By

Published : Oct 19, 2020, 2:59 PM IST

पाटणा - येत्या 28 ऑक्टोबरपासून बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकांना सुरुवात होणार आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दिवगंत माजी मंत्री रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीसोबत आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयुसोबत युती केली आहे. मात्र आता लोजपा आणि जदयुमधील अर्तंगत वाद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची डोकेदुखी ठरत आहे.

बिहार विधानसभा निवडणुक

लोक जनशक्ती पार्टी हीच बिहारमध्ये भाजपची खरी मित्र आहे. आमच्या पक्षाने आतापर्यंत प्रत्येकवेळी भाजपची साथ दिली आहे. राम मंदिर, तीन तलाक, कलम 370, एनआरसी यासारख्या प्रत्येक मुद्द्यावर लोजपाने भाजपचे उघडपणे समर्थन केले आहे. या उलट जदयु हा भाजपचा संधीसाधू मित्र असल्याचे लोजपाने म्हटले आहे. दरम्यान जदयुने लोजपाच्या या टीकेला उत्तर देणे टाळले आहे. जदयुची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे भाजपच्या काही मुद्द्यांवर जदयु सहमत असेलच असे नाही. मात्र आम्ही भाजपचे चांगले मित्र आहोत. असे जदयुच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. तसेच याहीवेळी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील असेही ते म्हणालेत. दरम्यान एनडीएतील या दोन्ही घटक पक्षातील अंर्तगतवादाचा भाजपला बिहारमध्ये फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.