कोलकाता - पश्चिम बंगालच्या घटल येथील भाजप उमेदवार आणि आयपीएस अधिकारी भारती घोष यांनी टीएमसी कार्यकर्त्यांना उघड-उघड धमकी दिली. टीएमसी कार्यकर्त्यांनी लोकांना मतदान करण्यापासून अडवल्यास त्यांना बेदम मारहाण करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या
'तुम्ही लोकांना धमकी देत आहात की, मतदान करू नये. जर मतदारांना धमकी दिली तर, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या घरांमधून बाहेर ओढून मारले जाईल,' असे त्यांनी म्हटले. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात भारती घोष 'मी उत्तर प्रदेशातून हजार लोकांना बोलवेन आणि तुम्हा सर्वांना धडा शिकवेन,' असे म्हणताना दिसत आहेत.