ETV Bharat / bharat

पत्नीसह दोन मुलांची हत्या करून पतीची आत्महत्या ; राजस्थानमधील घटना - पतीने केली पत्नीसह दोन मुलांची हत्या

जिल्ह्यातील गजनेर पोलीस स्टेशन परिसरातील सूरजदा गावात बुधवारी रात्री पतीने पत्नीसह दोन मुलांची (मुलगा आणि मुलगी) गळा आवळून ह्त्या केली. त्यानंतर आत्महत्या करून स्वत:चे आयुष्यही संपवले. घरात होणार्‍या वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे.

bikaner
bikaner
author img

By

Published : Jul 23, 2020, 11:44 AM IST

बीकानेर - जिल्ह्यातील गजनेर पोलीस स्टेशन परिसरातील सूरजदा गावात बुधवारी रात्री पतीने पत्नीसह दोन मुलांची (मुलगा आणि मुलगी) गळा आवळून ह्त्या केली. त्यानंतर आत्महत्या करून स्वत:चे आयुष्यही संपवले. मात्र, या घटनेत मृताची एक मुलगी जागी असल्यामुळे ती बचावली आहे. घटनेची माहिती मिळताच गजनेर पोलीस अधिकारी अमरसिंह घटनास्थळी दाखल झाले.

सध्या पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली आहे. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. घरात होणार्‍या वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे.

दरम्यान बिकानेरच्या जयनारायण व्यास कॉलनी पोलीस स्टेशन परिसरातील शिवबारी भागात गुरुवारी आणखी एक घटना उघडकीस आली आहे. जेथे एका पतीने झोपत असलेल्या आपल्या पत्नीला पेटवून दिले आणि फरार झाला. एका वर्षापूर्वी या दोघांचे लग्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी मृताच्या कुटूंबाला माहिती दिली असून आरोपी पतीचा शोध सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.