ETV Bharat / bharat

बिहारच्या 'या' गावात आजही मूलभूत सुविधांचा अभाव, ग्रामस्थांची स्थिती दयनीय - Bihars Araria village lacks basic facilities

हे गाव जरी अररिया शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि बिहारच्या जोकीहाट विधानसभा मतदार संघात येत असले तरी हे गाव देशाच्या विकसनशील खेड्यांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले नाही, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. ते म्हणतात की, सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

बिहारच्या 'या' गावात आजही मूलभूत सुविधांचा अभाव

author img

By

Published : Sep 27, 2020, 8:20 PM IST

अररिया (बिहार) : स्वातंत्र्यानंतर 73 वर्षानंतरही बिहारच्या अररिया जिल्ह्यातील रामराई गावात शाळा, रुग्णालये आणि रस्ते यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या गावातील 90 टक्के जनता निरक्षर आहे आणि त्यांच्या नव्या पिढीलाही खेड्यात शैक्षणिक सुविधा नाहीत, यावरून या गावाची दयनीय अवस्था सहज लक्षात येईल.

रामरई खेड्यातील रहिवाशांना आरोग्य सेवेची सुविधा नसणे ही सर्वात मोठी समस्या आहे. गावात स्वच्छता आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी यासाठी कोणतीही सुविधा नाही. सरकारला बहुचर्चित स्वच्छ भारत अभियानांतर्गत (एसबीए) एकही शौचालय या गावात बांधता आलेले नाही.

येथील लोकांना स्वयंपाकासाठी पर्यायी इंधनाची व्यवस्था नाही. गावातील घरांमझ्ये अजूनही स्वयंपाकासाठी उर्जेचा मुख्य स्त्रोत म्हणून लाकूड आणि झाडाची पानेच वापरली जात आहेत.

बिहारच्या 'या' गावात आजही मूलभूत सुविधांचा अभाव

हेही वाचा - भोपाळ : वडिलांसोबत ल्युडो खेळात हरल्यानंतर तरुणीची कौटुंबिक न्यायालयात धाव

स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना ब्रिटिशांच्या काळात काळ्या पाण्याला (अंदमान व निकोबार बेटांचे वसाहती तुरुंग) पाठविण्यात येत असे. या गावाला अंदमान आणि निकोबार असेही नाव पडले आहे. कारण हे गाव तिन्ही बाजूंनी नद्यांनी वेढलेले आहे.

हे गाव जरी अररिया शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि बिहारच्या जोकीहाट विधानसभा मतदार संघात येत असले तरी हे गाव देशाच्या विकसनशील खेड्यांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले नाही, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. ते म्हणतात की, सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

स्वातंत्र्यानंतर तब्बल 73 वर्षे उलटली असली तरी या गावाला राज्यातील इतर भागांशी जोडण्यासाठी सरकारने बाकरा नदीवर अद्याप काँक्रीट पूल बांधलेला नाही, असे गाऱ्हाणे येथील ग्रामस्थांनी मांडले आहे.

हेही वाचा - रस्त्याची दुरवस्था, प्रसूतीसाठी महिलेला बाजेवरून दोन किलोमीटरवर चिखलातून काढावी लागली वाट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.