ETV Bharat / bharat

वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात.. - todays big events

आज दिवसभरातील या घटनांवर राहणार विशेष लक्ष...

big news and events of 11 january
वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात..
author img

By

Published : Jan 11, 2021, 2:01 AM IST

कोरोना लसीकरण : पंतप्रधान मोदींचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोनाची सद्यस्थिती आणि लसीकरण कार्यक्रमाबद्दल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली. कोरोना संक्रमण कालावधीत पंतप्रधानांनी अनेक प्रसंगी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

big news and events of 11 january
पंतप्रधान नरेंद्र मोदी

शेतकरी आंदोलनाचा ४७वा दिवस

कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज ४७वा दिवस आहे. दिल्लीच्या सीमांवर प्रमुख ४० शेतकरी संघटनांसह, देशभरातील सुमारे ५०० शेतकरी संघटनांचे हजारो शेतकरी ठाण मांडून आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आलेल्या थंडीच्या लाटेमध्येही हे शेतकरी सीमांवरतीच बसून आहेत. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, आणि एमएसपी लागू करावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी ही आंदोलने सुरू आहेत.

big news and events of 11 january
शेतकरी आंदोलन

शेतकरी आंदोलनाशी संबंधित सर्व याचिकांवर सुनावणी

शेतकरी आंदोलनाशी संबंधित सर्व याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एस. अ. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर असे दिसून आले की, शेतकर्‍यांच्या कामगिरीच्या संदर्भात भूजल पातळीवर कोणतीही सुधारणा झालेली नाही.

big news and events of 11 january
शेतकरी आंदोलन

आज येडियुरप्पांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरील निर्णय

मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना त्यांच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी उच्च नेतृत्त्वातून हिरवा कंदील मिळाला आहे. आता तो मंत्रिमंडळाच्या लांबणीवर असलेल्या प्रक्रियेची प्रक्रिया पुढे आणू शकणार आहे. मंत्रिमंडळात नवीन सदस्यांना समाविष्ट करण्याचा अंतिम निर्णय आज सोमवारी घेतला जाऊ शकतो. येडियुरप्पा म्हणाले की, सात नवीन सदस्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल. मंत्रिमंडळात नवीन सदस्यांची शपथविधी १३ जानेवारी रोजी होईल.

big news and events of 11 january
येडियुरप्पा

मराठा आरक्षण : अशोक चव्हाणच्या अध्यक्षतेखाली आज वकिलांची बैठक

सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज ११ जानेवारी रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे.

big news and events of 11 january
अशोक चव्हाण

वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे ईडीचे पुन्हा समन्स

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून तपास केला जात असताना यासंदर्भात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. त्यांना आज ११ जानेवारीला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सागंण्यात आले आहे.

big news and events of 11 january
संजय राऊत आणि वर्षा राऊत

आज माळेगाव खंडोबाची देवस्वारी

माळेगाव यात्रेत आज ११ जानेवारीला देवस्वारी (पालखी सोहळा) होणार आहे. ही पूजा धार्मिक प्रथेनुसार पार पडणार आहे. मात्र, यानंतरचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे स्टॉल याठिकाणी लावले जातात. यासोबतच पशु प्रदर्शन, कला महोत्सव, लावणी महोत्सव यासारखे कार्यक्रम जिल्हा परिषदेकडून घेतले जात होते. कोरोना रोखण्यासाठी शासनाने घातलेल्या निर्बंधांनुसार आता हे कार्यक्रमही होणार नाहीत.

big news and events of 11 january
माळेगाव खंडोबाची देवस्वारी

पालघर जिल्ह्यात मनाई आदेश

पालघर जिल्ह्यात मराठा आरक्षण प्रश्न, वाढवण बंदर, शेतकरी आंदोलने,आणि रिलायन्स गॅस पाईप लाईन पीडित शेतकऱ्यांची आंदोलने झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि जनजीवन सुरळीत राहण्यासाठी पालघर जिल्ह्यात 28 डिसेंबर ते 10 जानेवारी 2021 पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

big news and events of 11 january
पालघर

सिडनी कसोटीचा शेवटचा दिवस दिवस

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित करत पहिल्या डावातील ९४ धावांची आघाडी मिळून भारतासमोर विजयासाठी ४०७ धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने २ बाद ९८ धावा केल्या आहेत. कर्णधार अजिंक्य रहाणे (९) अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (४) नाबाद खेळत आहेत. भारतीय संघाला विजयासाठी आज शेवटच्या दिवशी आणखी ३०९ धावांची गरज आहे.

big news and events of 11 january
सिडनी कसोटी

सय्यद मुश्ताक अली स्पर्धा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेपासून झाली आहे. या स्पर्धेचे सामने १० ते ३१ जानेवारी दरम्यान सहा राज्यात खेळवले जातील. कोरोनाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईची डोमेस्टीक मोहीम आजपासून सुरु होत आहे. आज मुंबईचा सामना दिल्लीशी वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

big news and events of 11 january
सूर्यकुमार यादव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.