ETV Bharat / bharat

वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात.. - todays big events

आज दिवसभरातील या घटनांवर राहणार विशेष लक्ष...

big news and events of 10 january
वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात..
author img

By

Published : Jan 10, 2021, 4:01 AM IST

आज जागतिक हिंदी दिन

प्रत्येक तारखेचा काही इतिहास असतो, परंतु १० जानेवारीचा इतिहास अनेक प्रकारे महत्त्वाचा आहे, विशेषतः हिंदी रसिकांसाठी, कारण हा दिवस जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी हिंदीच्या प्रचारासाठी २००६ मध्ये प्रत्येक वर्षी १० जानेवारी रोजी हिंदी दिन साजरा करण्याची घोषणा केली.

big news and events of 10 january
जागतिक हिंदी दिवस

कझाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका

आज १० जानेवारीला कझाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. कझाकिस्तानमधील संसदेच्या खालच्या सभागृहाला मजलिस म्हणतात, ज्यांचे एकूण १०७ सदस्य आहेत. त्यांना डेप्युटी म्हणतात आणि पाच वर्षांसाठी ते निवडले जातात.

big news and events of 10 january
कझाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका

शेतकरी आंदोलनाचा ४६वा दिवस

कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज ४६वा दिवस आहे. दिल्लीच्या सीमांवर प्रमुख ४० शेतकरी संघटनांसह, देशभरातील सुमारे ५०० शेतकरी संघटनांचे हजारो शेतकरी ठाण मांडून आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आलेल्या थंडीच्या लाटेमध्येही हे शेतकरी सीमांवरतीच बसून आहेत. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, आणि एमएसपी लागू करावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी ही आंदोलने सुरू आहेत.

big news and events of 10 january
शेतरी आंदोलन

हरियाणाचे मुख्यमंत्री करनालमधील शेतकऱ्यांना भेटणार

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आज करनालमधील शेतकऱयांशी संवाद साधणार आहेत. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असून दीड महिन्यापासून शेतकरी राजधानीच्या सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. शुकवारी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांची चर्चेची आठवी फेरीही निष्फळ ठरली.

big news and events of 10 january
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर

जगनमोहन रेड्डींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

सीबीआय कोर्टाने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांना उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता प्रकरणात आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

big news and events of 10 january
जगनमोहन रेड्डी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भंडाऱ्याला जाणार

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शिवाय त्यांनी या घटनेच्या चौकशीचे तातडीने आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री आज दुपारी १२ वाजता भंडारा दौर्‍यावर येणार आहेत. मृतक मुलांच्या कुटुंबीयांना ते भेट देतील.

big news and events of 10 january
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज

राज्यावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय असले तरी त्याचा प्रभाव कमी होत असल्याने येत्या दोन दिवसांत पावसाळी वातावरण दूर होईल, असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात आज रविवारी काही ठिकाणी हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे.

big news and events of 10 january
महाराष्ट्र हवामान

पालघर जिल्ह्यात मनाई आदेश

पालघर जिल्ह्यात मराठा आरक्षण प्रश्न, वाढवण बंदर, शेतकरी आंदोलने,आणि रिलायन्स गॅस पाईप लाईन पीडित शेतकऱ्यांची आंदोलने झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि जनजीवन सुरळीत राहण्यासाठी पालघर जिल्ह्यात 28 डिसेंबर ते 10 जानेवारी 2021 पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

big news and events of 10 january
पालघर

सिडनी कसोटीचा चौथा दिवस

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील तिसरा सामना सिडनी येथे होत आहे. या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर भारताने २ बाद ९६ धावा केल्या. अनुभवी स्टीव्ह स्मिथचे शतक (१३१) आणि मार्नस लाबूशेन, विल पुकोव्हस्कीची अर्धशतके यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ धावांपर्यंत मजल मारली.

big news and events of 10 january
भारत वि. ऑस्ट्रेलिया

सय्यद मुश्ताक अली स्पर्धा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेपासून होणार आहे. या स्पर्धेचे सामने १० ते ३१ जानेवारी दरम्यान सहा राज्यात खेळवले जातील. जैव सुरक्षित वातावरणात (बायो बबल) ही स्पर्धा पार पडेल.

big news and events of 10 january
बीसीसीआय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.