बंगळुरु - लॉकडाऊनमुळे सर्वकाही व्यवहार ठप्प होते. लोकांना बाहेर फिरण्यास मज्जाव होता. आता अनलॉकमुळे हळूहळू सर्व व्यवहार पूर्ववत होत आहेत. कर्नाटकच्या होस्कोटेतील एका दुकानावर लॉकडाऊननंतर खवय्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. 'आनंद दम बिर्याणी' या बिर्याणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या दुकानावर नागरिकांनी झुंबड उडवली आहे. दुकानाबाहेर खवय्यांनी रांगा लावल्याचे दिसून आले.
बिर्याणी मिळवण्यासाठी खवय्ये तासनतास वाट पाहण्यास तयार आहेत. सकाळी 4 वाजता मी बिर्याणी घेण्यासाठी येथे आलो आहे. अखेर दोन तासानंतर सकाळी 6.30 वाजता मला माझी ऑर्डर मिळाली. ही बिर्याणी खुपच चविष्ट असून त्यासाठी वाट पाहण्यात काहीत हरकत नाही, असे एका ग्राहकाने सांगितले.
मी जवळजवळ दोन तास रांगेत उभे राहिलो. कारण बरेच लोक त्यांच्या ऑर्डरची वाट पाहत होते. ही बिर्याणी घेण्याची माझी पहिलीच वेळ आहे. मी येथे तयार केलेल्या बिर्याणीबद्दल बरेच काही ऐकले आहे. याबद्दल मी सर्व सोशल मीडियावर वाचले आहे, असे एका दुसऱ्या ग्राहकाने सांगितले.