ETV Bharat / bharat

लॉकडाऊनमध्येही बंगळुरू विमानतळावरुन 3 हजार परदेशी नागरिकांना सुरक्षितरित्या पोहोचवले - बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ

लॉकडाऊनमुळे जगभरात हजारो आंतरराष्ट्रीय प्रवासी अडकले आहेत. त्यात बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने जवळपास ३ हजार नागरिकांना जगभरातील १७ ठिकाणांवर सुरक्षित पोहोचवण्यात आल्याचा दावा केला आहे.

लॉकडाऊनमध्येही बंगळुरू विमानतळावरुन 3 हजार परदेशी नागरिकांना सुरक्षितरित्या पोहोचवले

author img

By

Published : Apr 30, 2020, 12:01 PM IST

बंगळुरू - बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (बीआयएएल) लॉकडाऊन दरम्यान कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन जगभरातील १७ ठिकाणांकरता सेवा सुरू केली आहे. यामध्ये सुमारे ३ हजार परदेशी नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाकरता २२ उड्डााणांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशभरात लॉकडाऊनमुळे बंद असल्याने, बंगळुरू आणि दक्षिण भारतामध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांना मदत करण्यासाठी या विमान कंपन्यांनी समन्वय केले होते.

याबाबत बीएआयएल कार्यकारिणीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, टर्मिनलमधील बीआयएएल कर्मचार्‍यांच्या पाठिंब्याने, सीआयएसएफ, इमिग्रेशन आणि एअरलाईन कर्मचार्‍यांसोबत काम करताना प्रत्येक उड्डानादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांद्वारे सामाजिक अंतर राखण्यावर लक्ष दिले गेले. तसेच, हँड सॅनिटायझर आणि मास्कचे वाटपदेखील करण्यात आल्याचे, असे सांगण्यात आले आहे.

माहितीनुसार, प्रवाशांच्या स्वागतासाठी टर्मिनल, एअरसाइड आणि आतील गाभाऱ्यांनाचीही अनेकदा स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले. या व्यतिरिक्त, टर्मिनलच्या बाहेर असलेल्या जागेतील टाईल्सनाही पॉलिश आणि इतर सर्व तयाऱ्या करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, टोक्योला प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता जेएएल बरोबर तीन उड्डानांची तयारी करण्यात आली. तर, इंचियन (दक्षिण कोरिया) या कोरियन एअरच्या मदतीने दुसऱ्या अन्य एका विमानाचे उड्डाण करण्यात आले. यानंतर, अन्य स्थळी प्रवास करणाऱ्यांमध्ये, अझरबैजान, बगदाद, कैरो, कोलंबो, दोहा, फ्रँकफर्ट, लंडन, नर, मस्कट, पॅरिस, पारो (भूतान), रियाध, रोम आणि स्टॉकहोम आणि तिबिलिसी (जॉर्जिया) येथील नागरिकांचा समावेश होता.

३१ मार्चला एअर इंडियाच्या विमानाने फ्रँकफर्टला केआयएकडून प्रथम स्थलांतरण करण्यात आले. यामध्ये केआयएने आठ नवीन शहर बाकू (अझरबैजान), बगदाद, कैरो, इंचेऑन, पारो (भूतान), रोम आणि स्टॉकहोम आणि तिबिलिसी (जॉर्जिया) यांची नावे समाविष्ट करत येथे पहिल्यांदाच विमान सेवा सुरू केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.