कोलकाता - स्थलांतरित मजूरांना मदत म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याची मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. यासोबतच, असंघटीत कामगारांनाही अशाच प्रकारची मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दिल्लीमध्ये होणाऱ्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या काही वेळापूर्वी त्यांनी ट्विट करत याबाबत मागणी केली. यासाठी पंतप्रधान मोदींच्या पीएम-केअर फंडचा काही भागही वापरला जाऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या आहेत.
-
People have been facing economic hardship of unimaginable proportions bcz of the ongoing pandemic. I appeal to Central Govt to transfer ₹10,000 each as one-time assistance to migrant labourers including people in unorganized sector. A portion of PM-CARES could be used for this.
— Mamata Banerjee (@MamataOfficial) June 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">People have been facing economic hardship of unimaginable proportions bcz of the ongoing pandemic. I appeal to Central Govt to transfer ₹10,000 each as one-time assistance to migrant labourers including people in unorganized sector. A portion of PM-CARES could be used for this.
— Mamata Banerjee (@MamataOfficial) June 3, 2020People have been facing economic hardship of unimaginable proportions bcz of the ongoing pandemic. I appeal to Central Govt to transfer ₹10,000 each as one-time assistance to migrant labourers including people in unorganized sector. A portion of PM-CARES could be used for this.
— Mamata Banerjee (@MamataOfficial) June 3, 2020
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही मदत गरजेची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : भारत-बांगलादेश सीमेजवळ 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप