गुरुदासपूर- बीयास नदीला आलेल्या पुरातून एकूण ११ नागरिकांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. यामध्ये ४ महिलांचा समावेश असून, गुरुदासपूर जिल्ह्यात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
अतिवृष्टीमुळे पंजाबमधील बीयास नदीच्या पूर पातळीत अचानक वाढ झाली. त्यामुळे गुरुदासपूर जिल्ह्यातील चेछीया छुरियाँ गावाजवळ गुज्जर समाजातील काही लोक त्यांच्या म्हशींसह अडकले होते. याची माहिती मिळताच उपायुक्त विपूल उज्वल यांनी घटनास्थळी बचाव पथकास रवाना केले.
जिल्हा प्रशासन व लष्कराने तत्काळ संयुक्त मोहीम राबवून या ग्रामस्थांची सुटका केली आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्ह्यातील उथळ प्रदेश तसेच रावी व बीयास नद्यांजवळील भागात न जाण्याचे आवाहन उपायुक्तांनी केले आहे.