ETV Bharat / bharat

अर्थमंत्र्यांचे युद्ध : चिदंबरम, सितारामन यांचे येस बँक संकटावरून आरोप-प्रत्यारोप.. - येस बँक प्रकरण

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी त्यापूर्वी एका ट्विटमध्ये असे म्हटले होते की, भाजप सहा वर्षांपासून सत्तेत आहे. वित्तीय संस्थांचे प्रशासन आणि नियमन करण्याची त्यांची क्षमता उघड झाली आहे. बँकिंग क्षेत्रातील संकटाबद्दल मोदी सरकारला लक्ष्य करणारे एकटे चिदंबरम हेच नव्हते, पण ट्विटच्या मालिकेतून त्यांनी जो हल्ला चढवला त्यामुळे कदाचित सितारामन यांनी दुपारी पत्रकार परिषद बोलवून तपशीलवार पद्धतीने त्यांच्या टिकेच्या हल्ल्याला उत्तर दिले.

Battle of Finance Ministers: Chidambaram, Sitharaman trade charges over Yes Bank crisis
अर्थमंत्र्यांचे युद्ध : चिदंबरम, सितारामन यांचे येस बँक संकटावरून आरोप-प्रत्यारोप..
author img

By

Published : Mar 8, 2020, 11:10 PM IST

बँकिंग क्षेत्रातील पेच हाताळण्यावरून मोदी सरकारवर वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी हल्ला चढवला होता. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी चिदंबरम यांनी केलेल्या आरोपांचे तीव्र खंडन केले. यूपीए सरकारने आपल्या कार्यकाळात तीन बँकांच्या कोसळण्यास जबाबदार असलेल्या कोणत्याही व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात आणले नाही, असे त्या म्हणाल्या. बँकिंग क्षेत्रातील पेचप्रसंग हाताळण्याच्या यूपीएच्या पद्घतीच्या अगदी उलट, ज्यात लोकांची जबाबदारी निश्चित केली जात नव्हती, आपण आरबीआयला चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यास सांगितले आहे, असे सितारामन म्हणाल्या. ज्यामुळे तातडीने कारवाईसह कायद्यानुसार जे व्हायचे ते होईल, असेही त्यांनी सांगितले.

अनिल अंबानी समूह, एस्सेल समूह, डीएचएफएल, आयएलएफएस आणि व्होडाफोन अशा तणावग्रस्त कंपन्यांना यूपीए सरकारच्या काळात बँकेने मोठ्या प्रमाणावर कर्ज दिल्याने बँक कोसळण्यास सुरूवात झाली, असा आरोप सितारामन यांनी केला. येस बँक ही माजी व्यवस्थापकीत संचालक आणि सीईओ राणा कपूर यांनी स्थापन केली असून गेल्या वर्षी जानेवारीत कपूर यांना आरबीआयने त्यांची मुदतवाढीची विनंती मान्य न केल्याने पायउतार व्हावे लागले होते.

सितारामन यांनी संकटाचा तडाखा बसलेल्या युनायटेड वेस्टर्न बँकेचे आयडीबीआयमध्ये २००६ मध्ये विलिनीकरण झाल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे संतुलन बिघडले, असाही दोष त्यांनी दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि माजी अर्थंमंत्री पी.चिदंबरम यांनी येस बँक पेचप्रसंगाबद्दल मोदी सरकारची खिल्ली उडवली होती. त्यानंतर निर्मला सितारामन यांनी एक पत्रकार परिषद बोलवली होती.

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी त्यापूर्वी एका ट्विटमध्ये असे म्हटले होते की, भाजप सहा वर्षांपासून सत्तेत आहे. वित्तीय संस्थांचे प्रशासन आणि नियमन करण्याची त्यांची क्षमता उघड झाली आहे. बँकिंग क्षेत्रातील संकटाबद्दल मोदी सरकारला लक्ष्य करणारे एकटे चिदंबरम हेच नव्हते, पण ट्विटच्या मालिकेतून त्यांनी जो हल्ला चढवला त्यामुळे कदाचित सितारामन यांनी दुपारी पत्रकार परिषद बोलवून तपशीलवार पद्धतीने त्यांच्या टिकेच्या हल्ल्याला उत्तर दिले.

प्रथम पीएमसी बँक झाली. आता येस बँक आहे. सरकारला या सर्वाची काळजी आहे की नाही? ते आपली जबाबदारी टाळू शकते का? असा सवाल माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला होता. तसेच आणखी एखादी तिसरी बँक रांगेत आहे का, असा सवालही त्यांनी केला. यामुळे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ग्लोबल ट्रस्ट बँक (जीटीबी), युनायटेड वेस्टर्न बँक (युडब्ल्यूबी) आणि गणेश बँक ऑफ कुरूंदवाड (जीबीके) यांचे त्यांनी दाखले दिले. यूपीए सरकारने या बँकांचे पतन टाळण्यासाठी त्यांचे अन्य बँकांमध्ये विलिनीकरण केले, असे सितारामन यांनी सांगितले.

सितारामन यांनी यूपीए सरकारवर कोणतीही जबाबदारी निश्चित न करता संकटात सापडलेली बँक अन्य बँकांमध्य विलिन करून आपले हात झटकण्याचा आरोप केला. ग्लोबल ट्रस्ट बँक जुलै २००४ मध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये विलिन करण्यात आली तर युनायटेड वेस्टर्न बँक आयडीबीआय बँकेत आणि गणेश बँक ऑफ कुरूंदवाड बँक खासगी क्षेत्रातील बँक फेडरल बँकेत २००६ मध्ये विलिन करण्यात आली.

उघडपणे संतप्त दिसणाऱ्या सितारामन यांनी सांगितले की, मी तुम्हाला स्वयंनियुक्त सक्षम डॉक्टरांनी युनायटेड वेस्टर्न बँकेचे आयडीबीआयमध्ये विलिनीकरणाचा प्रश्न कसा हाताळला, याचे अगदी स्पष्ट उदाहरण देते. आयडीबीआय खाली गेली आणि युनायटेड वेस्टर्नला तसेही आव्हान दिले गेले. ही वागणूक त्यांनी दिली जे आज आम्ही ज्या पद्धतीने प्रकरण हाताळले त्याबद्दल बोलत आहेत. आम्ही येस बँक आणि ग्राहकांचे हित सुरक्षित राहिल, याची खात्री केली आहे. आम्ही ते करत आहोत.

मी हे विचारते की, किती लोकांविरोधात त्यांनी (यूपीए सरकार) कारवाई केली, असे जोरदार उत्तर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिले. मात्र, ज्येष्ठ काँग्रेस नेते ज्यांनी २००४ ते २०१४ दरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बहुतेक कार्यकाळात अर्थमंत्रालयाचा कारभार पाहिला, ते चिदंबरम या जशास तसे वाक्युद्घात मागे राहणार नव्हतेच. त्यांनी यूपीए सरकारच्या काळात येस बँकेतील पेच सुरू झाला, हा निर्मला सितारामन यांचा आरोप फेटाळून लावला.

अर्थमंत्र्यांनी माध्यमांना काय उत्तर दिले ते ऐकले. अपेक्षेप्रमाणे, त्यांनी येस बँकेच्या जवळपास अधःपतनाचा अप्रत्यक्ष दोष यूपीएला दिला,जे त्यांच्या स्वतःच्याच विधानाच्या विरूद्ध आहे. त्यांनी हा पेचप्रसंग २०१७ मध्ये सुरू झाल्याचे म्हटले होते, असे निर्मला सितारामन यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले आहे.

- कृष्णानंद त्रिपाठी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.