ETV Bharat / bharat

बंगळुरू पोलीसही आता टिकटॉकवर; शार्ट व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांशी राहणार 'कनेक्टेड'

author img

By

Published : Feb 7, 2020, 7:25 PM IST

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस नागरिकांच्या संपर्कात राहणार आहेत.

बंगळुरु पोलीस, bangalore police
बंगळुरु पोलीस

बंगळुरू - टिकटॉक हे सोशल मीडिया माध्यम आबालवृद्धांसह सर्वांनाच आकर्षित करत आहे. छोट्या-छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देण्यासाठी टिकटॉक प्रभावी माध्यम ठरत आहे. त्यामुळे बंगळुरू पोलीसही आता टिकटॉकवर आले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांसाठी संवाद साधण्याचा उद्देश डोळ्यापुढे ठेवून पोलिसांनी टिकटॉक अकांऊट सुरू केले आहे.

हेही वाचा - केरळ सरकारने अर्थसंकल्पाच्या मुखपृष्ठावर छापले गांधींच्या हत्येचे छायाचित्र

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस नागरिकांच्या संपर्कात राहणार आहेत. टिकटॉक अकाऊंट सुरू केल्यानंतर शहराचे पोलीस आयुक्त म्हणाले की, नागरिकांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाच्या ताकदीवर आमचा विश्वास आहे. टिकटॉक हे नवे माध्यम असून नागरी समस्यांबाबत लोकांच्या संपर्कात राहण्याची ताकद या माध्यमात आहे. याद्वारे अभिनव पद्धतीने लोकांशी संपर्क साधण्यात येणार आहे.

हेही वाचा - अचानक बॉम्ब स्फोट झाला अन् ब्रिटीश अधिकारी हॉटेलमध्ये सैरावैरा धावला

बंगळुरू पोलिसांनी टिकटॉक अकाऊंट सुरू केल्यानंतर टिकटॉक कंपनीच्या प्रवक्त्याने पोलिसांचे आभार मानले आहे. स्थानिक नागरिकांशी निगडीत माहिती (कन्टेन्ट) या माध्यमावर तयार करता येते. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दलांना नागरिकांच्या संपर्कात राहता येईल. भविष्यामध्ये आणखी पोलीस विभाग टिकटॉकवर येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बंगळुरू पोलिसांच्या आधी केरळ पोलीस, उत्तराखंड पोलीस, दुर्ग पोलिसांनीही टिकटॉकवर अकाऊंट सुरू केले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.