ETV Bharat / bharat

कोरोना व्हायरस: संसर्गाच्या भीतीनं भारतातील गुगलंच ऑफिस बंद

देशभरांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा पहिला बळीही कर्नाटकात गेला आहे. आत्तापर्यंत ७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

गुगल संग्रहित छायाचित्र
गुगल संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 13, 2020, 11:50 AM IST

बंगळुरु- कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचे ७० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयासह सिनेमागृहेही अनेक राज्यांनी बंद ठेवली आहे. मात्र, कोरोनाचा फटका आता बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही बसायला लागला आहे. बंगळुरुमधल्या गुगल कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर ऑफिस बंद ठेवण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.

'बंगळुरु कार्यालयातील आमच्या एका कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोनाची लक्षण दिसण्याआधी काही तास तो कार्यालयामध्ये होता. आता त्याला अलिप्त ठेवण्यात आले आहे, अशी माहिती गुगल कार्यालयाने दिली. कोरोनाच्या प्रसारामुळे आम्ही कर्मचाऱ्यांना उद्यापासून घरूनच काम (वर्क फ्रॉम होम) करण्याचे सांगितले आहे. आरोग्य विभागाच्या आदेशानुसार आम्ही योग्य ती काळजी घेत राहू, असेही गुगलने स्पष्ट केले आहे.

  • Google: Out of an abundance of caution, we are asking employees in that Bengaluru office to work from home from tomorrow. We have taken & will continue to take necessary precautionary measures, following the advice of public health officials. https://t.co/RJo2FIkRwm

    — ANI (@ANI) March 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

देशात रुग्णांचा आकडा ७५, तर महाराष्ट्रात १४ बाधित

देशभरांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा पहिला बळीही कर्नाटकात गेला आहे. आत्तापर्यंत ७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अनेकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्येही कोरोनाचे आणखी तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १४ वर पोहोचली आहे. यामधील पुण्यामधील रुग्ण हा अमेरिकेतून आला होता, तर ठाण्यातील रुग्ण हा फ्रान्सवरून आल्याची माहिती मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.