नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीवर मार्ग काढण्यासाठी ३ सदस्यांची मध्यस्थी समितीची नेमणूक केली होती. त्या समितीचे अध्यात्मिक सदस्य व आर्ट आफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांना राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नसल्याची माहिती आर्ट आफ लिव्हिंग फाऊंडेशनने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
३ सदस्यांच्या मध्यस्थी समितीला ४ आठवड्यांमध्ये अयोध्या प्रकरणावर कामकाज सुरू करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या समितीची कमान सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींच्या हातात देण्यात आली आहे. त्यामध्ये एक आध्यात्मिक गुरू आणि वरिष्ठ वकिलाचा समावेश आहे. जाणून घेऊया हे व्यक्ती आहेत तरी कोण?
जस्टिस एम. एफ. कलिफुल्ला -
न्यायमूर्ती एम. एफ. कलिफुल्ला हे सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आहेत. न्यायालयाने त्यांच्यावर मध्यस्थी समितीची जबाबदारी सोपवली आहे. तामिळनाडू येथे राहणारे कलिफुल्ला यांचे पूर्ण नाव फकिर मोहम्मद इब्राहिम कलिफुल्ला आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पदापासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपद भूषवले आहे. २० ऑगस्ट १९७५ला त्यांनी वकिली व्यवसायाला सुरूवात केली होती. त्यानंतर २०००मध्ये त्यांना मद्रास उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायमूर्ती पद देण्यात आले होते. फेब्रुवारी २०११मध्ये जम्मू-काश्मीरच्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदही त्यांनी भूषवले आहे. २ एप्रिल २०१२मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोपवण्यात आले होते. तर, २२ जुलै २०१६ ला ते सेवानिवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीचे आपण अध्यक्ष आहोत. या समितीमध्ये विशेष काळजी घेऊनच आपण मार्ग काढणार, असे कलिफुल्ला यांनी नियुक्त झाल्यानंतर म्हटले आहे.
श्री श्री रवीशंकर
रविशंकर ख्यातनाम आध्यात्मिक गुरू आहेत. ते आर्ट ऑफ लिव्हिंग या आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक आहेत. यापूर्वी त्यांनी अयोध्या प्रश्न आपल्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यामध्ये ते अपयशी ठरले होते. यांचे देश-विदेशात अनेक अनुयायी आहेत. १९८१मध्ये त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेची स्थापना केली होती. वर्षानुवर्षे चालत आलेल्या संघर्षाला सुखांत करण्यासाठी सर्वांना या लक्ष्याकडे जाणे गरजेचे आहे, असे रविशंकर यांनी ट्विट करून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.
श्रीराम पंचू -
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीमध्ये श्रीराम पंचू यांचाही समावेश आहे. ते मागील ४० वर्षांपासून वकिली व्यवसायात आहेत. मागील २० वर्षापासून अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये मध्यस्थी करण्याचे काम करत आहेत. त्यांनी मीडिएशन चेंबर्स नावाचे मध्यस्थी करणारी एक संस्थाही स्थापन केली आहे.