ETV Bharat / bharat

'माझ्यावर हल्ला झाल्याचा पुरावा माझ्याकडे आहे' आयेशी घोषकडून आरोपांचे खंडन

जेएनयू हिंसाचार प्रकरणातील संशयितांपैकी एक म्हणून दिल्ली पोलिसांनी तिचे नाव घेतल्यानंतर काही मिनिटातच आयेशाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ती म्हणाली, "आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. आम्ही दिल्ली पोलिसांना घाबरत नाही. आम्ही कायद्याच्या बाजूने उभे राहून शांततेत आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करू"

s
विद्यार्थी संघटनेची अध्याक्षा आयेशी घोष
author img

By

Published : Jan 10, 2020, 6:36 PM IST

Updated : Jan 10, 2020, 8:07 PM IST

नवी दिल्ली - जेएनयू कॅम्पसमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी नऊ संशयितांची नावे जाहीर केली आहेत. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयेशी घोष हिचेही नाव आहे. पोलिसांच्या या आरेपाचे आयेशीने खंडन केले आहे. "पोलिसांनी माझ्याविरोधात पुरावा दाखवावा. माझ्याकडे माझ्यावर कशाप्रकारे हल्ला झाला याचा पुरावा आहे" असे आयेशीने म्हटले आहे.

हेही वाचा - जेएनयू हिंसाचार : पोलिसांकडून संशयितांचे फोटो जारी; संशयितांमध्ये आयेशी घोषचाही समावेश

जेएनयू हिंसाचार प्रकरणातील संशयितांपैकी एक म्हणून दिल्ली पोलिसांनी तिचे नाव घेतल्यानंतर काही मिनिटातच आयेशीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ती म्हणाली, "आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. आम्ही दिल्ली पोलिसांना घाबरत नाही. आम्ही कायद्याच्या बाजूने उभे राहून शांततेत आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करू"

5 जानेवारी काही हल्लेखोरांनी जेएनयू परिसरात घुसून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मारहाण केली होती. याप्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. चंचुन कुमार, पंकज मिश्रा, आयेशी घोष (जेएनयूएसयू अध्यक्ष), वास्कर विजय, सुचेता तालुकाराज, प्रिया रंजन, डोलन सावंत, योगेंद्र भारद्वाज, विकास पटेल यांचा संशयितांमध्ये समावेश असल्याचे, पोलीस उपायुक्त जॉय तिर्की यांनी सांगितले आहे.

Intro:Body:

नवी दिल्ली - जेएनयू कॅम्पसमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी नऊ संशयितांची नावे जाहिर केली आहेत. यात विद्यार्थी संघटनेची अध्याक्षा आयेशी घोष हिचेही नाव आहे. पोलिसांच्या या आरेपाचे आयेशीने खंडन केले आहे. "पोलिसांनी माझ्याविरोधात पुरावा दाखवावा. माझ्याकडे माझ्यावर कशाप्रकारे हल्ला झाला याचा पुराव आहे" असे आयेशीने म्हटले आहे.

हेही वाचा -

जेएनयू हिंसाचार प्रकरणातील संशयितांपैकी एक म्हणून दिल्ली पोलिसांनी तिचे नाव घेतल्यानंतर काही मिनिटातच आयेशीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ती म्हणाली, "आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. आम्ही दिल्ली पोलिसांना घाबरत नाही. आम्ही कायद्याच्या बाजूने उभे राहून शांततेत आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करू"

5 जानेवारी काही हल्लेखोरांनी जेएनयू परिसरात घुसून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मारहाण केली होती. याप्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. चंचुन कुमार, पंकज मिश्रा, आयेशी घोष (जेएनयूएसयू अध्यक्ष), वास्कर विजय, सुचेता तालुकाराज, प्रिया रंजन, डोलन सावंत, योगेंद्र भारद्वाज, विकास पटेल यांचा संशयितांमध्ये समावेश असल्याचे, पोलीस उपायुक्त जॉय तिर्की यांनी सांगितले आहे.

Conclusion:
Last Updated : Jan 10, 2020, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.