ETV Bharat / bharat

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : आरोपी ऋषिकेश देवडीकर पुणे एटीएसच्या ताब्यात - Hrishikesh Devdikar

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातील पुणे एटीएसच्या ताब्यात दिले आहे.

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण
नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण
author img

By

Published : Feb 7, 2020, 5:15 PM IST

Updated : Feb 7, 2020, 6:09 PM IST

मुंबई - ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातील पुणे एटीएसच्या ताब्यात दिले आहे. तसेच त्यांना 11 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक 2018 मध्ये नालासोपारा येथे शस्त्रसाठा मिळाल्याप्रकरणाचा तपास करत आहे.

एटीएसने 2018 मध्ये नालासोपारा येथे तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी छापे टाकले होते. तेव्हा बॉम्ब, पिस्तूल असा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला होता. त्याप्रकरणी एटीएस तपासणी करत आहे.

दरम्यान, सनबर्न फेस्टिव्हल हे पाश्चात्य संस्कृतीचे द्योतक असल्याचे फेस्टिवलमध्ये गोळीबार करून बॉम्बस्फोट घडवण्याचा देवडीकरचा डाव होता, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. गौरी लंकेश हत्या, नालासोपारा शस्त्रसाठा आणि सनबर्न फेस्टिव्हल अशी 'लिंक' जोडली गेली आहे.

आरोपी ऋषिकेश देवडीकरला कर्नाटक पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने झारखंडमधील धनबाद येथून अटक केली होती. आरोपी ऋषिकेश देवडीकर हा मूळचा औरंगाबादचा आहे. हृषिकेश देवडीकर औरंगाबादेत काही वर्षे वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. हृषिकेश औरंगाबादच्या सिडको परिसरात एन 9 भागात पतंजलीचे दुकान चालवत होता.

Intro:Body:

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : आरोपी ऋषिकेश देवरीडीकर पुणे एटीएसच्या ताब्यात

मुंबई - ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातील पुणे एटीएसच्या ताब्यात दिले आहे. तसेच त्याची 11 फेब्रुवरीपर्यंत कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवादी पथक 2018 मध्ये नालासोपारा येथे शस्त्रसाठा मिळाल्याप्रकरणी तपासणी करत आहे.  

एटीएसने 2018 मध्ये नालासोपारा येथे तसेच महाराष्ट्रातील इतर ठीकाणी छापे टाकले होते. तेव्हा बॉम्ब, पिस्तूल असा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला होता. त्याप्रकरणी एटीएस तपासणी करत आहे.

दरम्यान सनबर्न फेस्टिव्हल हे पाश्चात्य संस्कृतीचे द्योतक असल्याचे फेस्टिवलमध्ये  गोळीबार करून बॉम्बस्फोट घडवण्याचा देवडीकरचा डाव होता, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.  गोरी लकेंश हत्या, नालासोपारा शस्त्रसाठा आणि  सनबर्न फेस्टिव्हल अशी लिंक  जोडली गेली आहे.

आरोपी ऋषिकेश देवरीडीकरला कर्नाटक पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने झारखंडमधील धनबाद येथून अटक केली होती. आरोपी ऋषिकेश देवडीकर हा मूळचा औरंगाबादचा आहे.  हृषिकेश देवडीकर औरंगाबादेत काही वर्षे वास्तव्यास असल्याच समोर आले आहे. हृषिकेश औरंगाबादच्या सिडको परिसरात ऐन 9 भागात पतंजलीचे दुकान चालवत होता.

Conclusion:
Last Updated : Feb 7, 2020, 6:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.