ETV Bharat / bharat

सफर... जगातील सर्वात जास्त लांबीच्या अटल बोगद्याची! - अटल बिहारी वाजपेयी टनेल

अटल बोगदा सर्वप्रकारच्या वातावरणात प्रवासाला खुला राहणार असून दळणवळणाच्या दृष्टीने हा बोगदा उपयुक्त ठरणार आहे. अटल बोगद्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत...

अटल बोगदा
अटल बोगदा
author img

By

Published : Oct 3, 2020, 1:52 PM IST

हैदराबाद - रोहतांग पासला लेह-लडाखशी जोडणारा 'अटल बोगद्या'चे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केले. रोहतांग पासच्या खाली धोरणात्मक बोगदा बांधण्याचा ऐतिहासिक निर्णय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतला होता. त्यामुळेच या बोगद्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. हा बोगदा सर्वप्रकारच्या वातावरणात प्रवासाला खुला राहणार असून दळणवळणाच्या दृष्टीने हा बोगदा उपयुक्त ठरणार आहे. अटल बोगद्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या बोगद्याविषयी आज आपण जाणून घेऊया....

Atal Tunnel
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने वरदान

अटल बोगद्याची लांबी 9.2 किलोमीटर तर, 10 मीटर रुंद आहे. या बोगद्याच्या निर्माणासाठी जवळपास 10 वर्षांचा कालावधी लागला आहे. समुद्र सपाटीपासून 3000 मीटर (सुमारे 10,000 फूट) हिमालयातील पिर पंजाल पर्वतरांगांमध्ये अल्ट्रा मॉडर्न पद्धतीने हा बोगदा खोदण्यात आला आहे. दररोज 3000 कार आणि 1500 ट्रक कमाल 80 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने प्रवास करू शकतील. साधारणपणे 3,200 कोटी खर्च या बोगद्यास आला आहे.

Atal Tunnel
सर्वप्रकारच्या वातावरणात प्रवासास खुला

हिमाचल प्रदेश लेह-लडाख भागाला कायम जोडलेला राहणार आहे. सेनेची शस्त्र आणि इतर सामग्री आता वर्षभरात कोणत्याही वेळेत सहजच पोहचवणे शक्य होणार आहे. बोगद्यामुळे मनाली आणि किलाँगमधील 46 किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे.

बोगद्यात प्रत्येक 150 मीटरवर टेलीफोनची सोय आहे. प्रत्येक 60 मीटरवर (197 फूट) आग विझवण्यासाठी नळ बसवलेला आहे. प्रत्येक 500 मीटर (1,640 फूट) अंतरावर आपात्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग आहे. प्रत्येक 250 मीटर (820 फूट) सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. ज्यामुळे वाहतुकीवर पूर्णपणे लक्ष ठेवता येणार आहे.

Atal Tunnel
दळणवळणाच्या दृष्टिनी अटल बोगदा उपयुक्त

रोहतांग खिंडीच्या खालून बोगदा काढण्याचा निर्णय माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने 3 जून 2000ला घेतला होता. त्यानंतर 26 मे 2002ला बोगद्याच्या दक्षिणेकडील तोंडाकडे जाणाऱ्या रस्त्याची पायाभरणी झाली होती.

हिमस्खलन अथवा दरड कोसळून अपघात होऊ नये म्हणून ह्या बोगद्याच्या दोन्ही बाजूला सेन्सर बसवण्यात आले आहेत. ज्याची यंत्रणा डीआरडीओने विकसित केली आहे. 'अटल बोगदा' देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या काळात भारतीय सेनेसाठी वरदान ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.