ETV Bharat / bharat

प्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार साकारणार 'अटल' मूर्ती; शिमल्यात होणार प्रतिष्ठापना - Sculptor Ram Sutar

प्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार हे मूळचे धुळे जिल्ह्याचे. ते दिल्लीत राहतात. त्यांनी गुजराथ येथील सरदार वल्लभ भाई पटेल मूर्तीची डिझाईन तयार केली आहे. यावेळी ते माजी पंतप्रधान वाजपेयी यांची मूर्ती साकारणार आहेत. शिमल्यातील एका मॉलमध्ये या मूर्तीची स्थापना होणार आहे. मूर्तीची निर्मिती कांस्य धातूने होणार आहे.

मूर्तीकार अनिल राम सुतार
मूर्तीकार अनिल राम सुतार
author img

By

Published : Sep 28, 2020, 8:30 PM IST

Updated : Sep 29, 2020, 4:03 PM IST

नवी दिल्ली- देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 'अटल' या मूर्तीची प्रतिष्ठापना शिमल्यात होणार आहे. ही मूर्ती प्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार यांच्या हस्ते तयार केली जाणार आहे. मूर्ती कांस्य धातूने बनवण्यात येणार असून तिची उंची ९ फूट असणार आहे. याबाबत राम सुतार यांचे चिरंजीव अनिल राम सुतार यांच्याशी चर्चा केली असता, पुढच्या महिन्यापर्यंत मूर्ती तयार करून तिला हिमांचल सरकारला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माहिती देताना मूर्तीकार अनिल राम सुतार

प्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार हे मूळचे धुळे जिल्ह्याचे. ते दिल्लीत राहतात. त्यांनी गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल मूर्तीची डिझाईन केली आहे. यावेळी ते माजी पंतप्रधान वाजपेयी यांची मूर्ती साकारणार आहेत. शिमल्यातील एका मॉलमध्ये या मूर्तीची स्थापना होणार आहे. मूर्तीची निर्मिती कांस्य धातूने होणार आहे. त्यामुळे, तिला गंज लागणार नाही.

मूर्ती बनवताना माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या चेहऱ्यावरील भाव, अभिवादन करताना त्यांच्यातील शरीरिक बदल व हातांची स्थिती, स्वभाव, धोती घालण्याची पद्धत, कुर्ता घालण्याची पद्धत, या सर्व गोष्टींना केंद्रस्थानी ठेवूनच तिची निर्मिती केली जाणार असल्याचे राम सुतार यांचे चिरंजीव अनिल सुतार यांनी सांगितले.

यावेळी अनिल सुतार यांनी माजी पंतप्रधान वाजपेयी आणि त्यांच्या वडिलांसंबंधी एका आठवणीला उजाळा दिला. एकदा वाजपेयी हे शहीद पार्क येथे उद्घाटनाप्रसंगी आले होते. पार्कमधील मूर्तींना राम सुतार यांनी बनवले होते. मात्र, निमंत्रणपत्रिका नसल्याने सुतार यांना सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वाराजवळच अडवून ठेवले. मात्र, जेव्हा वाजपेयी यांनी स्वत: स्टेजवरून सुतार यांचे नाव घेतले, तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना स्टेजवर नेले. यावेळी वाजपेयींनी सुतार यांना शॉल देऊन त्यांचा सत्कार केला होता.

राम सुतार यांचा महाराष्ट्र कनेक्शन..

राम सुतार हे मूळचे महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील रहिवासी. त्यांना बालपणात लहान मूर्ती बनवणे व भिंतीवर चित्र रेखाटण्याचे काम आवडत होते. त्यांचे हेच गुण ओळखून त्यांचे गुरू श्री राम कृष्ण जोशी यांनी त्यांना जे.जे स्कुल ऑफ आर्टमध्ये दाखल केले. कलेची गोडी असल्याने सुतार यांनी शिक्षणातही यश संपादन केले. त्यानंतर १९५८ या वर्षी ते दिल्लीला आले. त्यांनी सरकारी कार्यालयात एक वर्ष काम केले. त्यानंतर त्यांना मूर्ती बनवण्याची कामे मिळत गेली. नंतर ते दिल्लीतच स्थायिक झाले व त्यांनी स्वत:चा स्टुडिओ बनवला, अशी माहिती अनिल राम सुतार यांनी दिली.

महाराष्ट्रातील कामे..

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० फुटांची मूर्ती उभारण्यात येणार आहे. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची साडेतीनशे फुटांची मूर्ती देखील उभारण्यात येणार आहे. या दोन्ही मूर्तींचे डिझाईन सुतार पिता-पुत्रानी निर्मिलेले आहे.

तरुण मूर्तीकारांना दिला हा संदेश..

माझे वडील गावातून आले होते. त्यांनी खूप मेहनत केली. त्याचप्रकारे आजच्या तरुणांनी देखील मन लावून आपले कार्य करावे. त्यांना यश नक्कीच मिळेल, असे अनिल राम सुतार यांनी सांगितले.

हेही वाचा- जगातील सर्वात जुने 'आयएनएस विराट' इतिहासजमा

Last Updated : Sep 29, 2020, 4:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.