नवी दिल्ली - सद्य घडीला देशभरात भाजपमध्ये मेगाभरती सुरू असून यात आणखी दोघांची भर पडली आहे. महत्त्वाचे म्हणजे, ते दोघेही क्रीडापटू आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रवेशाचा वेग चांगलाच वाढलेला दिसून येत आहे.
या विधानसभा निवडणुकांच्याआधी भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंग याने भाजमध्ये प्रवेश केला आहे. संदीप सिंग बरोबर ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त हाही भाजपवासी झाला आहे.
-
Delhi: Former Indian Hockey captain Sandeep Singh joins BJP (Bharatiya Janata Party), in presence of Haryana Bharatiya Janata Party (BJP) Chief Subhash Barala. pic.twitter.com/PAPOiwIO3j
— ANI (@ANI) September 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi: Former Indian Hockey captain Sandeep Singh joins BJP (Bharatiya Janata Party), in presence of Haryana Bharatiya Janata Party (BJP) Chief Subhash Barala. pic.twitter.com/PAPOiwIO3j
— ANI (@ANI) September 26, 2019Delhi: Former Indian Hockey captain Sandeep Singh joins BJP (Bharatiya Janata Party), in presence of Haryana Bharatiya Janata Party (BJP) Chief Subhash Barala. pic.twitter.com/PAPOiwIO3j
— ANI (@ANI) September 26, 2019
हरियाणा राज्यात हॉकीचे प्रचंड वेड आहे. यात संदीप हा भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार राहिला आहे. यामुळे संदीप निवडणुकीसाठी उभा राहिला तर तो जिंकून येण्याची दाट शक्यता आहे, यामुळे भाजपने त्याला प्रवेश दिला आहे.
-
Delhi: Olympic Medallist Yogeshwar Dutt joins BJP (Bharatiya Janata Party), in presence of Haryana Bharatiya Janata Party (BJP) Chief Subhash Barala. pic.twitter.com/9cWmO4Vxe5
— ANI (@ANI) September 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi: Olympic Medallist Yogeshwar Dutt joins BJP (Bharatiya Janata Party), in presence of Haryana Bharatiya Janata Party (BJP) Chief Subhash Barala. pic.twitter.com/9cWmO4Vxe5
— ANI (@ANI) September 26, 2019Delhi: Olympic Medallist Yogeshwar Dutt joins BJP (Bharatiya Janata Party), in presence of Haryana Bharatiya Janata Party (BJP) Chief Subhash Barala. pic.twitter.com/9cWmO4Vxe5
— ANI (@ANI) September 26, 2019
योगेश्वर दत्तने कुस्ती विश्वात चांगले नाव कमावले आहे. तसेच योगेश्वर दत्त कोणत्याही वादात अडकलेला नाही. योगेश्वरची स्वच्छ प्रतिमा असल्याने, भाजपने त्याला आपल्या पक्षात सामिल करुन घेतले आहे.
दरम्यान, यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही भाजपमध्ये प्रवेश केला असून त्याने लोकसभेची सीट भाजपकडून लढवत खासदारही बनला आहे. आता विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने दोन मोठ्या खेळाडूंना आपल्या पक्षात सामील करुन घेतले आहे.
हेही वाचा - '...अन् मी सलामीवीर बनलो', वाचा सचिनची कहाणी...
हेही वाचा - आयपीएल प्रेमींसाठी मोठी बातमी, 'या' महिन्यात होणार लिलाव