ETV Bharat / bharat

'बोडोलँड' वाद अखेर मिटला; 50 वर्षापासून सुरू होता संघर्ष..

बोडोलँड वाद मिटवण्यात अखेर केंद्र सरकारला यश आले आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत केंद्र सरकार, आसाम सरकार आणि बोडो माओवादी यांच्यात एक करार करण्यात आला आहे.

separate bodoland
'बोडोलँड' वाद अखेर मिटला
author img

By

Published : Jan 28, 2020, 1:54 AM IST

Updated : Jan 28, 2020, 11:52 AM IST

गुवाहाटी - बोडोलँड वाद मिटवण्यात अखेर केंद्र सरकारला यश आले आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत केंद्र सरकार, आसाम सरकार आणि बोडो माओवादी यांच्यात एक करार करण्यात आला आहे. या करारामुळे गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेला 'बोडोलँड वाद' मिटला आहे. यामुळे ईशान्य भारतातील दहशतवाद संपवण्यासाठी मदत होईल.

'बोडोलँड' वाद अखेर मिटला; 50 वर्षापासून सुरू होता संघर्ष..

हेही वाचा - प्रेरणादायी! दोन्ही हात नसूनही 'ती' कोपराने काढते चित्र

बोडोलँड वाद संपवण्यासाठी मोदी सरकार अनेक वर्षे प्रयत्न करत होते. अमित शाह यांनी केंद्रीय मंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून या प्रयत्नांना वेग आला आणि अखेर सोमवारी हा करार करण्यात आला आहे. बोडोलँड वादामुळे आतापर्यंत जवळपास 3 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या करारामुळे आसाममधील नागरिकांचा विकास होण्यास मदत होईल आणि आसामवासीयांना भयमुक्त जीवन जगता येईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच बोडो माओवाद्यांना देण्यात आलेली आश्वासने नियोजित कालावधीत पूर्ण करण्यास सरकार कटिबद्ध आहे. या करारानंतर कोणतेही नवे राज्य निर्माण केले जाणार नाही, अशी माहिती शाह यांनी दिली.

  • Delhi: Government of India signs tripartite agreement with representatives of all factions of banned organisation National Democratic Front of Bodoland (NDFB) at Ministry of Home Affairs (MHA); Home Minister Amit Shah and Assam CM Sarbananda Sonowal present pic.twitter.com/Knyebw7WSo

    — ANI (@ANI) January 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे करार -

नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड या संघटनेचे १,५५० माओवादी ३० जानेवारीला आत्मसमर्पण करणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे असलेली शस्त्रास्त्रे सरकारला देणार आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jan 28, 2020, 11:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.