ETV Bharat / bharat

आशिया खंडातील सर्वात मोठी मानवनिर्मित 'जंगल सफारी', पंतप्रधान मोदीनींही केली प्रशंसा - Raipur Jungle Safari News

ही आशिया खंडातील सर्वात मोठी मनुष्यनिर्मित जंगल सफारी आहे. सन 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. 800 एकरात पसरलेल्या या जंगलात हर्बीवोर सफारी, बियर सफारी, टायगर सफारी आणि लॉयन सफारी अशा एकूण चार सफारी आहेत.

आशिया खंडातील सर्वात मोठी मानवनिर्मित 'जंगल सफारी'

author img

By

Published : Sep 17, 2020, 6:04 AM IST

रायपूर : छत्तीसगडच्या रायपूरमध्ये असलेले हे मानवनिर्मित जंगल खूप खास आहे. या जंगलाच्या आत चार वेगवेगळ्या सफारी आहेत. या सफारीची खास गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदींनी येथे येऊन जंगलाला भेट दिली. त्यांनी या भेटीदरम्यान येथील वाघाची छायाचित्रदेखील काढले होते. तर, वाघांना कॅमेऱ्यात बंदिस्त करतानाचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय ठरला होता.

आशिया खंडातील सर्वात मोठी मानवनिर्मित 'जंगल सफारी'

ही आशिया खंडातील सर्वात मोठी मनुष्यनिर्मित जंगल सफारी आहे. रायपूर रेल्वे स्थानकापासून सुमारे 35 किमी अंतरावर आणि स्वामी विवेकानंद विमानतळ रायपूरपासून 15 किमी अंतरावर या जंगलसफारीची स्थापना करण्यात आली आहे. सन 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. 800 एकरात पसरलेल्या या जंगलात सिंह, वाघ, अस्वलांसोबतच इतर वन्यप्राणी आहेत.

या जंगल सफारीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचताच एखाद्या मोठ्या उद्यानात किंवा बागेत पोहोचल्याचा अनुभव येतो. या हिरव्या बागेत काही अंतर चालत जाताच जंगल सफारी व्यवस्थापनाचे लोक आपले स्वागत करताना दिसतील. येथे वातानुकूलीत प्रतीक्षालय असून त्यात पर्यटकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. या दालनाच्या भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून छत्तीसगडच्या वन्यजीवनाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

या जंगलात हर्बीवोर सफारी, बियर सफारी, टायगर सफारी आणि लॉयन सफारी अशा एकूण चार सफारी आहेत. तसचे तृणभक्षी प्राण्यांच्या अधिवासानुसार मोठ्या प्रमाणात अंजनाची झाडे लावून त्याला घनदाट बनवण्यात आले आहे. हर्बीवोर सफारीमध्ये हरणांसह चितळ, काळवीट, सांबर आणि निलगाय पाहायला मिळतील. येथे हरणांच्या जवळपास ३०० प्रजातींना संरक्षित करण्यात आले आहे. नैसर्गिक अधिवासात असल्यामुळे त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हर्बीवोरमध्ये आपल्याला खाली उतरून या हरणांना पाहण्याची संधी मिळते.

पुढं गेल्यानंतर बियर सफारी लागते. मात्र, या ठिकाणी बसमधून खाली उतरणं अस्वलांमुळे धोक्याच ठरू शकते, त्यामुळे या सफारीचा आनंद बसमधूनच घ्यावा लागतो. अस्वलांना नैसर्गिक अधिवासात फिरताना पाहणं खरंच रोमांचकारी अनुभव आहे. ही बियर सफारी जवळपास ५० एकरात पसरली असून येथे ५ अस्वलांना ठेवण्यात आले आहे.

बियर सफारीनंतर बसने पुढे जाताना जंगल आणखी घनदाट होत जाते आणि आपण थोड्या वेळातच टायगर सफारीपर्यंत येऊन पोहोचतो. हा परिसरदेखील ५० एकरात पसरला आहे. येथे ४ वाघांचे वास्तव्य आहे. त्यांच्यासाठी येथे पाणवठे तयार करण्यात आले आहे, तर अन्नाच्या व्यवस्थेसाठी क्रॉलही बनवण्यात आले आहेत. या वाघांचे नियमितपणे मेडिकल चेकअप केले जाते. त्यांनाही जंगलात निवांत फिरताना किंवा जलक्रीडा करताना पाहण्याचा अनुभव आनंदासह अंगावर शहारे आणून जातो.

टायगर सफारीनंतर शेवटची सफारी म्हणजे लॉयन सफारी. ही सफारीही ५० एकरात पसरली आहे. येथे आल्यानंतर वाघांच्या आणि सिंहाच्या राहणीमानातला बदल आपल्या लक्षात येईल. वाघांच्या उलट सिंह आपल्या कुटुंबासह कळपाने राहतात. त्यांच्यासाठीही क्रॉलची व्यवस्था करण्यात आली असून क्रॉलच्या आसपास सिंहाचे लहान छावे आपल्याला खेळताना दिसतील.

चारही सफारींची मजा अनुभवल्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान जंगलाची लाइफलाइन असलेल्या खंडवा जलाशयाजवळ बस येऊन थांबते. येथे पर्यटकांसाठी बोटिंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे, छत्तीसगडला कधी गेलात तर या रोमांचकारी जंगल सफारीचा अनुभव घेण्यासाठी येथे आवर्जून भेट द्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.