नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी विधेयकाची प्रत फाडली. यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभेच्या हंगामी अध्यक्षा रमा देवी यांनी ओवेसींना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले.
जिन्नांची विचारसरणी नाकारुन मौलाना आझादांच्या तत्त्वांचा पुरस्कार करुन वाटचाल केली. आपले आणि हिंदुस्तानचे 1 हजार वर्षांपासूनचे संबंध असल्याचे आझाद म्हणाले होते. मग आताच्या सरकारला मुस्लिमांची इतकी अडचण का होते? असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला.
-
AIMIM leader Asaduddin Owaisi tore a copy of #CitizenshipAmendmentBill2019 in Lok Sabha. pic.twitter.com/pzU1NtutD8
— ANI (@ANI) December 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">AIMIM leader Asaduddin Owaisi tore a copy of #CitizenshipAmendmentBill2019 in Lok Sabha. pic.twitter.com/pzU1NtutD8
— ANI (@ANI) December 9, 2019AIMIM leader Asaduddin Owaisi tore a copy of #CitizenshipAmendmentBill2019 in Lok Sabha. pic.twitter.com/pzU1NtutD8
— ANI (@ANI) December 9, 2019
हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी केले अमित शाहांचे कौतुक
नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून देशाच्या विभाजनाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारनं आणलेले विधेयक घटनेच्या गाभ्याविरोधात आहे. हे विधेयक आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणारे आहे. देशाची फाळणी करणारे हे विधेयक मी फाडून टाकतो, असे ओवेसी म्हणाले.
हेही वाचा - लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर, विधेयकाच्या बाजूने 311 मतं