ETV Bharat / bharat

'पुलवामा'सारखा घातपाताचा कट उधळला; जैशच्या ३ दहशतवाद्यांना अटक

जम्मू - श्रीनगर महामार्गावर भारतीय जवानांनी जैश ए मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना अटक केली. यावेळी जवानांनी या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करुन जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा घातपाताचा कट उधळला.

author img

By

Published : Mar 25, 2019, 10:55 AM IST

संग्रहित छायाचित्र

श्रीनगर - जम्मू-श्रीनगर महामार्गावर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या ३ दहशतवाद्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती जम्मू पोलिसांनी दिली आहे. शहीद भट, रईस हुर्राह, इशाक लोन, असे अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

  • Jammu & Kashmir Police: Three terrorists affiliated with the proscribed terror outfit Jaish-e-Mohammed (JeM) were arrested today based on a credible input. Incriminating material including ammunition & live rounds recovered. A case has been registered. pic.twitter.com/wbJvCgD4zg

    — ANI (@ANI) March 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जम्मू - श्रीनगर मार्गावरुन कारमध्ये दहशतवादी जात असल्याची माहिती खबऱ्यांनी भारतीय जवानांना दिली होती. त्यामुळे राष्ट्रीय रायफलच्या ( २ बटालियन ) जवानांनी परिमपोरा नाक्यावर कसून तपासणी केली. यावेळी एका मारुती कारमधील तरुणांवर जवानांना संशय आला. त्यांची कसून तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा आणि दारूगोळा आढळून आला. जवानांनी त्यांची झाडाझडती घेतल्यानंतर ते जैश-ए-मोहम्मदचे सदस्य असल्याचे उघड झाले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासणी सुरू असल्याची माहिती जम्मूतील पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.