ETV Bharat / politics

25 कोटींची ऑफर मिळाल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश - HIRAMAN KHOSKAR NEWS

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. इगतपुरीतील काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

MLA Hiraman Khoskar joins Ajit Pawar NCP
आमदार हिरामण खोसकर राष्ट्रवादी प्रवेश (source- IANS)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2024, 8:13 AM IST

Updated : Oct 15, 2024, 8:24 AM IST

पुणे- विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय हालाचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षात काँग्रेसच्या विद्यमान आमदारानं प्रवेश केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

आमदार हिरामण खोसकर आणि त्यांच्या समर्थकांनी सोमवारी अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( अजित पवार गट) प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खोसकर यांचे पक्षात स्वागत केले. नुकतेच ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

आमदार हिरामण खोसकर यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी खोसकर यांचे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य संपत नाना साकळे यांच्यासह दहा-बार नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खोसकर यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी नाशिक आणि परिसरात पक्ष आणखी मजबूत होईल, असे राष्ट्रवादीनं म्हटलं आहे. हिरामाण खासकर यांना नाशिक भागात विशेषत: आदिवासी समाजात मोठे समर्थन आहे. खोसकर यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे, असे राष्ट्रवादी पक्षानं एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले आहे.

या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेमध्ये केला प्रवेश- संदीप गोपाळ गुळवे, संपतनाना साकळे, माजी जिल्हा परिषद सदस्य जर्नादन मामा माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, विनायक माळेकर, जयराम धांडे, प्रशांत कडू, पांडुमामा शिंदे, ज्ञानेश्वर कडू, सरपंच जगन कदम, फिरोज शेखर, तुळशी शेख, शेखर शेख आदी उपस्थित होते. रमेश जाधव, दशरथ भेगडे, सुदाम भोर, अरुण गायकर, शिवाजी सिरसाट यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

लवकरच विधानसभा निवडणुका होणार जाहीरराज्यात 288 मतदारसंघात विधानसभा निवडणुका होणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. आगामी महाराष्ट्र निवडणुकीत शिवसेना-उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस या महाविकास आघाडीची महायुतीविरोधात लढत होणार आहे. महायुती आघाडीमध्ये भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा समावेश आहे.

2019 मध्ये 25 कोटींची ऑफर दिल्याचा केला होता आरोप-आमदार हिरामण खोसकर यांनी निकालानंतर मला २५ कोटींची ऑफर करण्यात आली होती, असा 2019 मध्ये खळबळजनक दावा केला होता. ही ऑफर करणारा जवळचा मित्र असल्याचं सांगत त्यांनी नाव गुपित ठेवलं होतं. ही ऑफर आल्यानंतर खोसकर यांनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना याबाबत सावध केले. आपल्या पक्षातील आमदार फुटू शकतात अशी कल्पना त्यांनी नेत्यांना दिली. त्यानंतर काँग्रेसच्या काही आमदारांना जयपूरला नेण्यात आल्याचेही खोसकर यांनी दावा केला होता.

हेही वाचा-

Last Updated : Oct 15, 2024, 8:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.