मुलतान PAK vs ENG 2nd Test Live Streaming : पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना आज 15 ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. उभय संघांमधला हा सामना मुलतानच्या मुलतान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
⬅️ Gus Atkinson
— England Cricket (@englandcricket) October 14, 2024
⬅️ Chris Woakes
➡️ Matt Potts
➡️ Ben Stokes
Full focus on securing the series win 👊 pic.twitter.com/wUU8gD6q4g
पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा दारुण पराभव : पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं एक डाव आणि 47 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ पहिल्या 149 षटकांत 556 धावांवर सर्वबाद झाला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडनं 150 षटकांत 7 बाद 823 धावांचा हिमालय उभारत पहिला डाव घोषित केला आणि 267 धावांची आघाडीही मिळवली. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकनं 317 धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात यजमान संघ दुसऱ्या डावात 220 धावांत गारद झाला आणि इंग्लंडनं डावानं विजय मिळवला. यासह पाहुण्या संघानं तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका काबीज करण्याकडं इंग्लंडचं लक्ष असेल. तर दुसरीकडं, पाकिस्तान संघ पुन्हा एकदा मायदेशात कसोटी मालिका गमावण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत यजमान संघ दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधाण्याचा प्रयत्न करेल.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : कसोटीत पाकिस्तान आणि इंग्लंडचे संघ आतापर्यंत 90 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात इंग्लंडचा वरचष्मा दिसत आहे. इंग्लंडनं यातील 30 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्ताननं केवळ 21 सामने जिंकले आहेत. याशिवाय 39 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. तसंच उभय संघांमधील शेवटच्या पाच कसोटी सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर यात इंग्लंडचे वर्चस्व दिसून येतं. इंग्लंडनं 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत. एक सामना ड्रॉ झाला आहे.
💯 Going past Cooky
— England Cricket (@englandcricket) October 14, 2024
🗣️ A message from Ben Stokes
🏏 Having plenty more runs in the tank
Join us for an in-depth interview with Joe Root after his record-breaking week 👇
खेळपट्टी कशी असेल : मिळालेल्या वृत्तानुसार, पहिल्या सामन्याची खेळपट्टी मुलतानमधील दुसऱ्या कसोटीसाठी पुन्हा वापरण्यात येणार आहे. असं झाल्यास खेळपट्टी पुन्हा खराब होऊ शकते. ज्यामध्ये फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील. तर वेगवान गोलंदाजांना जुन्या चेंडूतून रिव्हर्स स्विंग मिळू शकते. तीच खेळपट्टी पुन्हा वापरली गेली तर खेळ जसजसा पुढं जाईल तसतशी फलंदाजी करणं कठीण होईल. या स्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन मोठी धावसंख्या फलकावर लावण्याचा प्रयत्न करू शकतो.
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचं पूर्ण वेळापत्रक :
- पहिला कसोटी सामना : 7-11 ऑक्टोबर, (इंग्लंड 1 डाव आणि 41 धावांनी विजयी)
- दुसरा कसोटी सामना : 15-19 ऑक्टोबर, मुलतान क्रिकेट स्टेडियम
- तिसरा कसोटी सामना : 24-28 ऑक्टोबर, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम
The men’s national selection committee has confirmed Pakistan’s playing XI for the second Test against England, starting in Multan on Tuesday, 15 October.#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/WzLnC0lfYQ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 14, 2024
- पाकिस्तान विरुद्ध इंलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी खेळला जाईल?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून (15 ऑक्टोबर 2024) खेळवला जाणार आहे.
- पाकिस्तान विरुद्ध इंलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कुठं खेळवला जाईल?
पाकिस्तान विरुद्ध इंलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पाकिस्तानातील मुलतान आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
- पाकिस्तान विरुद्ध इंलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना किती वाजता खेळवला जाईल?
पाकिस्तान विरुद्ध इंलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सुरु होईल. त्याची नाणेफेक अर्धा तास आधी सकाळी 10:00 वाजता होईल.
- पाकिस्तान विरुद्ध इंलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सामना तुम्ही टीव्हीवर कुठं पाहू शकता?
पाकिस्तान विरुद्ध इंलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारतात टीव्हीवर दिसणार नाही.
- पाकिस्तान विरुद्ध इंलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पाहता येईल?
पाकिस्तान विरुद्ध इंलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाईटवर केलं जाईल.
⬅️ Gus Atkinson
— England Cricket (@englandcricket) October 14, 2024
⬅️ Chris Woakes
➡️ Matt Potts
➡️ Ben Stokes
Full focus on securing the series win 👊 pic.twitter.com/wUU8gD6q4g
दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानची प्लेइंग 11 :
सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), कामरान गुलाम, सौद शकील (उपकर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, आमिर जमाल, नोमान अली, साजिद खान आणि जाहिद मेहमूद.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग 11 :
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ब्रायडन कार्स, मॅट पॉट्स, जॅक लीच, शोएब बशीर.
हेही वाचा :