ETV Bharat / bharat

चीन-नेपाळशी सीमावाद; सैन्यदलाचे प्रमुख सेंट्रल कमांड मुख्यालयाला आज भेट देणार - Indian Army Chief General visit to Lucknow

सैन्यदलाच्या सेंट्रल कमांडच्या कार्यक्षेत्रात उत्तराखंडमधील लेपूलेख हा प्रदेश येतो. त्या पार्श्वभूमीवर जनरल एम. एम. नरवणे यांचा दौरा हा महत्त्वपूर्ण आहे.

संग्रहित - सैन्यदलप्रमुख एम. एम. नरवणे
संग्रहित - सैन्यदलप्रमुख एम. एम. नरवणे
author img

By

Published : Aug 7, 2020, 2:40 PM IST

लखनौ – सैन्यदलाचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे हे लखनौमधील सेंट्रल कमांडच्या मुख्यालयाला आज भेट देणार आहेत. चीन आणि नेपाळच्या सीमेवर तणाव असताना ते परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सैन्यदलाचे प्रमुखपदी निवड झाल्यानंतर जनरल नरवणे यांचा हा पहिलाच लखनौ दौरा आहे.

सैन्यदलाच्या सेंट्रल कमांडच्या कार्यक्षेत्रात उत्तराखंडमधील लेपूलेख हा प्रदेश येतो. त्या पार्श्वभूमीवर जनरल एम. एम. नरवणे यांचा दौरा हा महत्त्वपूर्ण आहे. चीनचे सैनिक लिपूलेखच्या सीमारेषेवर तैनात झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले. दौऱ्यात सैन्यदलाचे प्रमुख नरवणे हे लखनौच्या दौऱ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गव्हर्नर आनंदीबेन पटेल यांची भेट घेणार आहेत.

जनरल नरवणे यांनी तेजपूर येथील 4 कॉर्प्स मुख्यालयाला गुरुवारी भेट दिली होती. या भेटीत त्यांनी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या प्रत्यक्ष ताबारेषेच्या स्थितीचा आणि सैन्यदलाच्या तयारीचा व्यापक आढावा घेतला आहे. सैन्यदलाच्या वरिष्ठ कंमांडरशी बोलताना त्यांनी सैन्यदल प्रमुखांनी अतिदक्षता ठेवण्याची सूचना केली आहे. पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर संबंध ताणले असताना नेपाळने उत्तराखंडमधील लेपूलेखसह तीन भूभागावर दावा केला आहे. त्यामुळे नेपाळ-भारतामधील संबंधही ताणले आहेत.

काय आहे उत्तराखंडमधील भूभागाचा वाद?

उत्तराखंडमधील तिन्ही वादग्रस्त भूभाग हा नेपाळचा हिस्सा असलेल्या राजकीय नकाशाला नुकेतच नेपाळच्या संसदेने एकमताने मंजुरी दिली आहे. या राजकीय नकाशात लिमिपियाधुरा, कालापानी आणि लिपूलेख हे नेपाळचा हिस्सा असल्याचे दाखविण्यात आले आहेत.

नेपाळने आजवर या भूभागावर दावा केला असला तरी भारताने त्याला विरोध केला आहे. कैलास मानवसरोवरला जाणाऱ्या रस्त्यावरही नुकतेच नेपाळने दावा केला आहे. या 80 किमी रस्त्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ यांनी उद्घाटन केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.