श्रीनगर - भारत पाकिस्तान सीमेवरील बारामुल्ला जिल्ह्यात लष्काराने दहशतावाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले आहेत. यावेळी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सीमेवर संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर सोमवारपासून शोधमोहिम राबविण्यात आली होती. नियंत्रण रेषेवरील रामपूर सेक्टरमध्ये जवानांना हे गुप्त तळ आढळून आले.
मोठा शस्त्रसाठा जप्त
५ एके सिरीजच्या रायफल्स, ६ पिस्तुल आणि २१ ग्रेनेड, २ बॉक्स बंदुकीच्या गोळ्या, ९ मॅक्झिन, २ यूबीजील ग्रेनेड, दोन रेडिओ सेट इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहेत. ३० ऑगस्टला सीमेवर संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर लष्कराने कारावई सुरू केली होती, त्याला यश आले आहे. या भागात सीमेवरील खेड्यांवर लष्कराने बारकाईने लक्ष ठेवत कारावई केली.
दहशतवाद्यांची काम करण्याची पद्धती..
पाकिस्तानी दहशतवादी सीमेवर शस्त्रसाठा ठेवून निघून जातात. त्यानंतर जम्मू काश्मिरातील दहशतावादी हा साठा ताब्यात घेवून विविध हल्ल्यांसाठी वापरता. खराब हवामान, पाऊस, घनदाट जंगल आणि डोंगराळ भागाचा फायदा घेत दहशतवादी घुसखोरी करतात.
डोंगराळ आणि घनदाट झाडी असलेला भूभाग, खराब हवामान अशा परिस्थितीत घुरखोरीची शक्यता अधिक असते. त्यामुळे सीमेवर गस्त वाढविण्यात आली होती. रात्रीच्या वेळीही या भागास्त गस्त घालण्यात येत होती. सात तासांच्या सर्च ऑपरेशननंतर लष्कराला दहशतवादी तळ आढळून आले.