ETV Bharat / bharat

बिहारमध्ये शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यासह चौघांना अटक

जिल्हा पोलीस अधीक्षक लिपी सिंग यांनी सांगितले की, पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार मुफस्सिल आणि असारगंज पोलिस ठाणे भागात चार ठिकाणी छापे टाकले आणि चार जणांसह शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आले. याप्रकरणी चौघांना अटक केली असून त्यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिहारमध्ये शस्त्रास्त्रे दारूगोळा जप्त न्यूज

author img

By

Published : Oct 4, 2020, 6:32 PM IST

मुंगेर (बिहार) - 'बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात रविवारी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातील शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे,' अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. मोहम्मद फाजल, पंकजसिंग, मोहम्मद शमशेर आणि सिंकू पाठक अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक लिपी सिंग यांनी सांगितले की, पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार मुफस्सिल आणि असारगंज पोलिस ठाणे भागात चार ठिकाणी छापे टाकले आणि चार जणांसह शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आले. 'यात पाच 7.65 मिमी पिस्तुल, दोन रिव्हॉल्व्हर्स, सहा देशी बनावटीच्या पिस्तूल, 63 काडतुसे आणि 10 मॅगेझीन्स जप्त करण्यात आली आहेत,' अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा - हुंडा दिला नाही म्हणून नवविवाहितेला तलाक; पती अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.