नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटाचा सर्वच क्षेत्राचे नुकसान झाले आहे. उद्योग व्यावसायासह शैक्षणिक क्षेत्रालही याचा खूप मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करण्याची तारीख ही १५ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. आधी ती ३० एप्रिल होती.
दिल्लीमध्ये दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवरही झाला आहे. ३० एप्रिलपर्यंत असणारी मुदत आता वाढवली असून, १५ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार आहेत.