नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ला आणि परिसरात अत्यंत कडक सुरक्षा वाढविण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हवाई हल्ला होण्याची धोका लक्षात घेता ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी एंटी एयरक्राफ्ट मशीन (गन) उंच इमारतीवर लावल्या आहेत. या माध्यमातून पाच किमीपर्यंत आकाशात काही संशयित आढळले तर ही गन त्यावर लक्ष ठेवेल.
माहितीनुसार, नुकताच अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हवाई हल्ला करण्याची शक्यता आहे. अलर्ट राहण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. यासाठी, हवेत उडणारी वस्तू वापरली जाऊ शकते. या सतर्कतेमुळे पोलीस आता लाल किल्ल्याच्या सभवतालच्या जमिनीवरच नव्हे तर आकाशातही कडक सुरक्षा व्यवस्था करत आहेत. पोलिसांनी या भागाला नो फ्लाइंग झोन म्हणून आधीच घोषित केले आहे.
लाल किल्ला आणि आसपासच्या परिसरात पाच हजारांहून अधिक जवानांना तैनात करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त 300 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे याठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून सायबर निगरानी (पेट्रोलिंग) करण्यात येणार आहे.
पोलिसांव्यतिरिक्त याठिकाणी अर्धसैनिक दल, एनएसजी आणि एसपीजी कमांडोंनाही पाचारण करण्यात येणार आहे. कार्यक्रमादरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही खबरदारी घेण्यात येणार आहे.