रांची- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणीक नवे रुग्ण समोर येत आहेत. झारखंडमध्येही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यातच कोरोनाचा एक नवा बाधित आढळला असून तो बोकारो जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे राज्यातील कोरोनाचा एकूण आकडा 14 वर पोहचला आहे.
हेही वाचा- मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, लॉकडाउन अधिक कडक करणार - राजेश टोपे
आतापर्यंत बोकारोमध्ये एकूण 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. परंतु, गुरुवारी आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर ती संख्या 6 वर पोहचली आहे. तर राज्याच्या आकडा 14 झाला आहे.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 16 वा दिवस आहे.