कृष्णा - आंध्र प्रदेशात कृष्णा जिल्ह्यात एक तरुणीने छेड काढणाऱ्या तरुणाला चप्पलने चांगलाच चोप दिला. कोडापल्ली शहरात ही घटना घडली. नंतर या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण बऱ्याच काळापासून छेडछाड करत असल्याचे या तरुणीने सांगितले. कालही तोच प्रकार झाला. अखेर संतप्त झालेल्या तरुणीने या तरुणाला चप्पलने चांगलेच धुतले. येथील स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर या ही तरुणीही निघून गेली.
'पोलिसांनी या तरुणीला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती सापडली नाही. तसेच, संशयित आरोपीनेही त्या तरुणीला ओळखत नसल्याचे सांगितले. अजूनही ही तरुणी कोण होती, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे,' असे पोलीस उपनिरीक्षक रमेश यांनी सांगितले. या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.