ETV Bharat / bharat

जम्मू काश्मिरातील मंगलेश्वर मंदिर देतेय बंधुभावाचा संदेश - मंगलेश्वर मंदिर बातमी

जम्मू काश्मीरमधील श्रीनगर शहरात बाबा डेम नहरच्या (कालवा) मधोमध मंगलेश्वर मंदिर आहे. जगातील प्राचीन मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि श्रद्धेचे एक उत्कृष्ट उदाहरण श्रीनगरमधील जनतेने घालून दिले आहे.

मंगलेश्वर मंदिर
मंगलेश्वर मंदिर
author img

By

Published : Oct 9, 2020, 7:42 PM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील श्रीनगर शहरात बाबा डेम नहरच्या (कालवा) मधोमध मंगलेश्वर मंदिर आहे. जगातील प्राचीन मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि श्रद्धेचे एक उत्कृष्ट उदाहरण श्रीनगरमधील जनतेने घालून दिले आहे.

या मंदिराची देखभाल समाज विकास नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेकडून करण्यात येते आहे. या संस्थेमध्ये अनेक मुस्लीम स्वयंसेवक आहेत. अनेक शतकांपासून हिंदू-मुस्लिम मिळून या मंदिराला स्वच्छ आणि सुरक्षित ठेवत आहेत.

मंगलेश्वर मंदिर

शहरातील स्थानिक नागरिक रियाज अहमद हे समाज विकास स्वयंसेवी संस्थेशी मागील १० वर्षांपासून जोडलेले आहेत. मंदिराची काळजी घेण्याचे काम ते आपले कर्तव्य समजून करत आहेत. शहरातील स्थानिक पंडित मंदिरात पूजापाठ करतात. त्यासोबतच दुसऱ्या राज्यातून येणारे नागरिकही मंदिरात पूजाअर्चना करतात. प्राचीन मंदिर असल्याने दुसऱ्या राज्यातूनही भाविक दर्शनासाठी येतात.

मंगलेश्वर मंदिराबरोबच शहरातील इतर मंदिरांची काळजी घेत असल्याचे सामाजिक विकास संस्थेच्या महासचिव एम. के पंडिता यांनी सांगितले. मात्र, पुरेशा मदती अभावी अनेक कामे अपूर्ण राहिल्याचे ते म्हणतात. सरकारने मंदिरांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार लवकरात लवकर करावा. त्यामुळे भाविकांना चांगल्या सुविधा मिळतील, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

काश्मीरमध्ये मागील अनेक दशकांपासून राजकीय तणाव पेटलेला आहे. दहशतवादी कारवाया तर सततच्याच झाल्या आहेत. काश्मिरी पंडितांवरही पूर्वी अत्याचार झाले. मात्र, अशा परिस्थितीतही स्थानिक नागरिकांनी बंधुभावाचा संदेश दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.