लखनौ - अलीगढमधील आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेली दगडफेक आणि पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर, आता अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. अनूपशहर चुंगी रस्त्यावर एकत्र येत विद्यार्थ्यांनी निदर्शने सुरू केली आहेत. याठिकाणी पोलीस आणि एएमयूच्या प्रॉक्टरचे एक पथक विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
अलीगढमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधी आंदोलनादरम्यान, पोलीस आणि आरएएफच्या पथकांवर आंदोलकांनी दगडफेक केली होती. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा मारा केला. यादरम्यान तीन तरुणांना गोळ्या लागल्या. या तीन तरुणांची नावे आरिफ, सुमित आणि राजेश असे असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, दिल्लीच्या जाफराबादमध्येही काल (शनिवार) रात्रीपासून सीएएविरोधी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा : सीएए विरोधी आंदोलन LIVE : अलीगढमधील इंटरनेट सेवा स्थगित, जाफराबादमध्ये निदर्शने सुरूच..