ETV Bharat / bharat

दीदीं’ना हादरा; तृणमूलच्या बड्या नेत्याने केला भाजपामध्ये प्रवेश

तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसचा ग्रामीण चेहरा मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी प्रथम कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर 16 डिसेंबरला त्यांनी आमदारिकीचा राजीनामा दिला. त्यानंतर लागलीच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

सुवेंदू अधिकारी
सुवेंदू अधिकारी
author img

By

Published : Dec 19, 2020, 3:13 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये नव्या वर्षात विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. मात्र, आतापासूनच राजकीय हादरे जाणवू लागले आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले आहेत.

तृणमूलच्या बड्या नेत्याने केला भाजपामध्ये प्रवेश

तृणमूल काँग्रेसचा ग्रामीण चेहरा मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी प्रथम कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर 16 डिसेंबरला त्यांनी आमदारिकीचा राजीनामा दिला. त्यानंतर लागलीच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्याचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला नसून त्यांना 21 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. राजीनाम्यात तारीख स्पष्ट न केल्यामुळे तो स्वीकारला नसल्याचे अध्यक्षांनी सांगितले. सुवेंदू यांच्या राजीनाम्यानंतर इतर आमदारांनीही राजीनामा देण्यास सुरवात केली आहे. आमदार शीलभद्रा दत्त आणि बन्सारी मैत्य यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

अधिकारी कुटुंबाचा राजकीय दबदबा -

सुवेंदू अधिकारी हे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार शिशिर अधिकारी यांचे थोरले पुत्र आहेत. सुवेंदू अधिकारी यांचे वडिल आणि भाऊ दोघेही खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालावरून तृणमूल काँग्रेसने पश्चिम मिदनापूर आणि झारग्राम या दोन जिल्ह्यांमध्ये यापूर्वी आपली पकड गमावली आहे. अधिकारी यांनी पक्ष सोडल्याने पूर्व मिदनापूरमध्ये पक्षाची स्थितीही खालावू शकते. सुवेंदू अधिकारीचा भाऊ दिव्येंदू अधिकारी पूर्व मिदनापूरमधील तामलूक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

तृणमूलचे भविष्य अंधकारमय -

सुवेंदू यांनी पक्ष सोडल्यानंतर वडील आणि दोन भावांनी त्याच मार्गाचा अवलंब केल्यास 16 व्या विधानसभा मतदारसंघात तृणमूलचे भविष्य अंधकारमय होईल. कारण, जिल्ह्यातील मतदारांच्या मोठ्या भागावर अधिकारी परिवाराचा प्रभाव अजूनही कायम आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे झाल्यास नंदीग्राममधील तृणमूल कॉंग्रेसची पाळेमुळे हादरली जातील.

गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगाल दौऱ्यावर -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी बंगालमधील दौरे वाढवले आहेत. अमित शहा यांनी मिशन बंगालचे लक्ष्य निश्चित केले. ममता बॅनर्जीही यावेळी भाजपाला गांभीर्याने घेत आहेत. कारण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांनी बंगालमधील 42 पैकी 22 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. निकालात भाजपाने 18 जागा जिंकल्या होत्या. तर टीएमसीला 22 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. अशा परिस्थितीत 2021 च्या विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगाल दौऱ्यावर

हेही वाचा - सुवेंदू अधिकारी यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.